तालुक्यातील पीक पाहणी करताना शेतकऱ्यांचा सन्मान

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर

गत दोन वर्षात कोरोनामुळे गर्दीपासून दूर राहणे सुरू होते. परंतु आता सर्व सण निर्बंध मुक्त महाराष्ट्र शासनाने सुरू केले आहेत. तेव्हा तुलसी सीड्स कडून कापूस पीक पाहणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. राळेगाव तालुक्यातील रावेरी येथिल शेतकरी ताणबाजी धोटे यांच्या शेतात कापूस पीक पाहणी कार्यक्रम आयोजित करण्यातआला होता कापूस पिकाचे नियोजन व कीड रोग आणि त्यांचे व्यवस्थापण यावर शेतकरी चर्चासत्र पार पडले आणि या वेळी शेतकऱ्यांना गुलाबी बोंड विषयी माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाला परिसरातील असंख्य शेतकरी वर्ग उपस्थित होता.या वेळी रावेरी येथील शेतकरी ताणबाजी धोटे यांना शेतकऱ्यांच्या उपस्थितीत शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले या वेळी साहेबरावजी मेसेकर यांनी शेतकऱ्याचा सत्कार केला. कार्यक्रमाचे आयोजन तुलसी सीड्स चे प्रतिनिधी ऋषीकेश मिर्झापुरे यांनी केले.