
सहसंपादक: रामभाऊ भोयर
वडकी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या एकुर्ली गावात मोठा जुगार खेळल्या जात असल्याची गोपनीय माहिती वडकी पोलिसांना मिळाली या गोपनीय माहितीच्या आधारे दि. २१ फेब्रुवारी २०२४ रोजी एकुर्ली येथे वडकी पोलिसांनी जुगार अड्ड्यावर धाड टाकून ४ लाख २४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एकुर्ली शेतशिवारात एक झाडाखाली काही इसम हे पत्यावर पैशाची बाजी लावुन हारजीतचा तीनपाणी खेळ खेळत असे या बाबत ठाणेदार विजय महले यांनी पोलीस पथक घेऊन सदर ठिकाणी धाड टाकली असता यात १० इसम मिळून आले असून त्यांच्याकडून नगदी ३८२०० रू नगदी व, ९ मोबाईल व ६ मोटर सायकल असा एकुन ४ लाख २४ हजार २०० /- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदची कार्यवाही ठाणेदार विजय महाले, पो.उपनि, प्रशांत जाधव, पोहेकॉ. विलास जाधव, नापोकॉ. सचिन नेवारे, पोकॉ. अरविंद चव्हाण तसेच होमर्गाड पथकातील अविनाश गाणफाडे, प्रितिभोज नागोसे, प्रविण चौधरी, अमरदीप पेचे, प्रणय बावणे, अजय आवारी, भूषण महाजन यांनी पार पाडली. आरोपीत इसमांवर पो.स्टे ला कलम 12 (अ) जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सुरू आहे.
