डॉ.अरविंद कुळमेथे यांचे नेतृत्वात सावरगाव येथे आरोग्य शिबीर संपन्न

सहसंपादक : रामभाऊ भोयर

सावरगाव येथील आरोग्य शिबिराचे उद्घघाटन बिरसा ब्रिगेड म. रा.अध्यक्ष डॉ.अरविंद कुळमेथे यांनी केले.अध्यक्ष आदिवासी सेवक बिरसा ब्रिगेड संघटक प्रा.वसंतराव कनाके हे होते. तसेच बिरसा ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष उमेश येरमे, गोलु कनाके यांनी रुग्ण सेवा व्यवस्थापन केले.आरोग्य तपासणी अथिती डॉक्टर म्हणून डॉ.निलेश चव्हाण(एम.एस ओर्थो तज्ञ), डॉ.कमलेश पेंदोर( मेडिकल ऑफिसर) आणि डॉ.अरविंद कुळमेथे यांनी सावरगाव येथील २७० रुग्णांची फ्री तपासणी करून औषदउपचार करून,आजारावरील औषद फ्री मध्ये देण्यात आली.गावातील प्रतिष्ठित प्रमुख पाहुणे म्हणून विठ्ठल रुकमायी देवस्थानचे अध्यक्ष आशिषभाऊ देशमुख, रामचंद्र धाडासे,विजू राणे,आरोग्य शिबीर आयोजक सरपंच किशोरभाऊ कंगाले,बाबाराव कंगाले, उकांडा कुळसंगे,नारायण कुळसंगे,गणपत मरस्कोल्हे,दिनेश कुलसंगे, चंदाबाई कंगाले,विमल केराम,सीमा मरकोल्हे,रंजना कुमरे,सविता कुलसंगे,प्रभा मडावी, प्रेमिका कुळसंगे,कांता रामपुरे,मायl कुलसंगे,शशिकला मरस्कोल्हे,शिल्पा कुलसंगे,संजय घोडम यांचे सहकार्य लाभले.समारोपीय भाषणात बिरसा ब्रिगेड नेतृत्व डॉ. अरविंद कुळमेथे यांनी जनतेला मार्गदर्शन करतांना सांगितले,कोणीही आपले आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. आपले आरोग्या संबंधी ज्या काही तक्रारी असतील त्या आम्हाला सांगा. आम्ही कोणतीही फी न घेता आपले आजारावर उपचार करू. आजlरा बाबदची समश्या लपूऊन ठेऊ नका.लपाविल्याने बीमारी वाढत असते.आमचे कार्यकर्ते गावागावात आहे,त्यांना सांगा, ते आम्हाला सांगतील.आता सर्वच आजारावर उपचार आहे.वेळीच डॉक्टरांचा सल्हा घ्या.आम्ही कधीही आपले सेवेत आहे असे सांगितले.राष्ट्र गीता नंतर आरोग्य शिबिराची सांगता करण्यात आली.