
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील झाडगाव येथील मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने वरूड जहाँगीर येथे दिनांक 8/10/2023 रोज शनिवारला वित्तीय व डिजीटल साक्षरता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात नागरिकांना नवीन बॅंकीग युग , वित्तीय व डीजोडायटेंशन या विषयाची तांत्रिक माहिती घ्यावयाची दक्षता या विषयी साक्षर करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष वरूड जहांगीर ग्राम पंचायत सदस्य तथा वसंत जिनिंगचे संचालक रामधन राठोड उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आर्थिक साक्षरता केंन्टरचे प्रमुख मार्गदर्शक दिपक देशमुख, मिलिंद इंगोले उपव्यवस्थापक विभागीय कार्यालय पांढरकवडा, जिवन खणगंन वसुली अधिकारी राळेगाव, नितीन वाघ शाखा व्यवस्थापक झाडगाव उपस्थित होते.त्यावेळी मिलिंद इंगोले यांनी उपस्थित नागरिकांना बॅंकीग आणि डिजिटल व्यवहार यांचे महत्त्व आणि व्यवहार करताना घ्यावयाची काळजी या विषयी अधिक माहिती दिली. तर उपसरव्यवस्थापक दिपक देशमुख यांनी बॅंकेच्या कर्जाविषयी आणि ठेवीविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच थकित कर्जदारांना प्रवाहात आणण्यासाठी बॅंकेनी ओ.टी.एस. योजना सुरू केली असल्याचे वसुली अधिकारी जिवन खंणगन यांनी उपस्थित नागरिकांना सांगितले. त्यावेळी गावातील अनेक नागरिक उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बॅंकेच्या सौ.रूपाली ओंकार,कु.रोशनी नेहारे, नटूभाऊ सुचक यांनी अथक परिश्रम घेतले असल्याचे शाखा व्यवस्थापक नितीन वाघ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
