
सहसंपादक : रामभाऊ भोयर
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्त दिं.१४ एप्रिल २०२५ रोज सोमवारला शहरात विविध कार्यक्रम साजरे करून जयंती साजरी करण्यात आली.
शहरातील विविध राजकीय पक्ष, नेते, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच शासकीय अधिकाऱ्यांनीही डॉ. आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी सोमवारला सकाळ पासूनच रांग लावली होती.तसेच शहरातील शेकडो बौद्ध उपासक उपसीका पांढरे वस्त्र परिधान करून बाबासाहेबाना अभिवादन करण्यासाठी एकच गर्दी केली होती सकाळी ८:०० वाजता महामानव डॉ बाबासाहेब यांना समूह नृत्याद्वारे सलामी देण्यात आली. त्यानंतर सकाळी ९:०० वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन व सामूहिक त्रिशरण पंचशील घेण्यात आले. यावेळी या कार्यक्रमाला अध्यक्ष अमित भोईटे तहसीलदार राळेगाव, तर प्रमुख पाहुणे सिताराम मेहेत्रे पोलिस निरीक्षक, मनोज निमसडकर प्राचार्य इंदिरा गांधी महाविद्यालय राळेगाव, प्रा स्वप्निल गोरे राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी इंदिरा गांधी कला महाविद्यालय राळेगाव ,आधी होते तर प्रमुख उपस्थित कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अरविंद वाढोनकर, राजेंद्र तेलंगे, नगरसेवक मंगेश राऊत, बाजार समितीचे संचालक गोवर्धन वाघमारे, सरपंच संघटनेचे अंकुश मुनेश्वर प्रकाश पोपट,किशोर धामंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत कला वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी संविधानावरील आधारित पथनाट्य सादर केले त्यानंतर घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील स्पर्धकांना मान्यवरांच्या उपस्थितीत वितरण सोहळा पार पडला.
तसेच ठीक ११ वाजता आंबेडकर विचार मंच्याच्या वतीने पुरी भाजीचे भोजन देण्यात आले त्यानंतर शहरातून बाईक रॅली काढण्यात आली , सायंकाळी ६:०० वाजता शहरातून विविध मार्गाने भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली असून या मिरवणुकीत तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे या गाण्यावर ताल धरत तसेच बोलो बोलो रे जयभीम बोलो अशा अनेक गगनभेदी घोषणांनी शहरातून मिरवणूक काढण्यात आली असून या मिरवणुकीचा शेवट आंबेडकर पुतळ्या जवळ करण्यात आला.या कार्यक्रमाच्या या कार्यक्रमाचे यशस्वितेकरिता आयोजक समितीचे अध्यक्ष संदीप लोहकरे, उपाध्यक्ष सोनाली ताकसांडे प्रशिक भोंगाडे सचिव डॉ.ओम प्रकाश फुलमाळी, सहसचिव रत्नमालाताई जीवने, कोषाध्यक्ष यश घडले,समन्वयक सौरभ पुडके, सदस्य :- अक्षय नगराळे, प्रशिक जिवणे, करण नगराळे, चेतन नगराळे, सचिन राऊत, सिध्दार्थ राऊत, प्रदीप नगराळे, राहुल कांबळे, अंकित भोंगाडे, दर्शन नगराळे, कपिल नगराळे, सुमित काळपांडे, अजय लोहवे, नयन लोहवे, मयूर जीवतोडे, महेश उमरे, वीरु खोंडे, प्रतीक चिकटे, पंकज नगराळे, यश नगराळे, यश वाघमारे, सम्यक आटे, सम्यक नगराळे, बादल थुल, प्रशिल देवतळे, उज्वल नगराळे, सतिश नगराळे, साहील पुडके, सिध्दांत थुल, प्रणय नगराळे, बुध्दपाल बेताल, अक्षय बेताल, पियुष कांबळे, प्रथमेश कांबळे, बबलू कांबळे, निसर्ग ताकसांडे, सम्यक बुरनुले, निखील नगराळे, विपुल भगत, प्रिन्स तागडे, अभिजीत नगराळे, विशाल वाघमारे, राकेश मुन, अॅड. दिक्षांत खैरे, अजय गायकवाड, बर्फी गायकवाड, वैभव नगराळे, अनुप नगराळे, अतुल भगत, कुणाल भसारकर, मनिष वाघमारे, शुभम नगराळे, चंदन नगराळे, भिमा वाघमारे, कुणाल नाखले, आशुतोष अंभोरे. आदींनी केले या कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रज्ञाताई पाटील (मॅडम)तर प्रास्ताविक दिपक आटे, तर आभार प्रदर्शन सौरभ पुडके यांनी केले.
