(ढानकी प्रतिनिधी प्रवीण जोशी)
दूरपर्यंत जाळे व्यापलेले म्हणून भारतीय दूरसंचार निगम लिमिटेड या कडे बघितल्या जाते आता जमिनी अंतर्गत वायरिंग जरी असली तरी ही दूरसंचार कंपनी मात्र ग्राहकाच्या पसंतीती उतरताना आपल्याला दिसत नाही एकेकाळी या कंपनीचा डंका होता बी एस एन एल चे सिम कार्ड घेण्यासाठी वाटेल तेवढी रक्कम ग्राहक मोजत असत पण आता मात्र यास घर घर लागली आहे. सर्व काही यंत्रणा असताना ही यंत्रणा राबविणारी हात मात्र निष्क्रिय आहेत की असे दिसते आहे तसेच ढानकी गावातील कार्यालयात एकही कर्मचारी उपलब्ध असताना दिसत नाही जर एखादे वेळेस जर ही यंत्रणा नादुरुस्त झाली असल्यास तालुक्याला कार्यालयात कळवावे लागते तेथून कर्मचारी येण्यास सुद्धा बराच वेळ लागतो याचा भुर्दंड मात्र सर्वसामान्य जनतेला भोगावे लागत आहे. याउलट खाजगी कंपन्यांनी आपले जाळे मात्र काही दिवसात अगदी मजबूत विनले आहे केवळ भारतीय दूर संचार निगम मुळेच पण भारतीय दूर संचार निगम बंद असलेल्या दिवशी नक्कीच ग्राहकाला रिचार्ज मर्यादा मुळीच वाढवून देणार नाही. त्यामुळे ही ग्राहकाची फसवणूक तर आहे शिवाय यास शुद्ध धूळफेक सुद्धा म्हणता येईल तसेच सर्व शासकीय कार्यालयात व खाजगी कार्यालयात सुद्धा ढानकी गावात फक्त बी एस एन ल ब्रॉडबँड होते .मागील दहा वर्षाचा आढावा घेतल्यास त्या वेळेस ग्राहक किती होते आणि आता किती आहे हे सर्व माहिती केल्यास भारतीय दूर संचार निगम यांची गावातील आजची परिस्थिती अत्यंत बेकार आहे हे लक्षात येते शिवाय या ठिकाणी एकही कायम स्वरूपाचा अधिकृत कर्मचारी नसल्यामुळे ढानकी येथील कार्यालय मोकाट च असते.त्यामुळे ग्राहकाना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो.
