
सहसंपादक : रामभाऊ भोयर
स्मॉल वंडर हा. स्कूल आणि कला वाणिज्य व विज्ञान ज्यु कॉलेज वडकी ता. राळेगाव जिल्हा यवमाळ येथील प्राचार्य पदावर कार्यरत असलेल्या डॉ..मंजूषा दौलतराव सागर यांची विद्या वाचस्पती सारस्वत’ सन्मानासाठी निवड करण्यात
आली आहे.ही निवड पंडित दीनदयाल उपाध्याय हिन्दी विद्यापीठाच्या उत्तर प्रदेशच्या वतीने करण्यात आली . कार्यक्रमातपद्मश्री मा. डॉ.अरविंद कुमार पूर्व कुलपती व राणी लक्ष्मबाई केंद्रीय कृषी विद्यालय झांसी.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते कुलपती दीनदयाल उपाध्याय हिंदी विद्यापीठ डॉ.इंदू भूषण मिश्रा उपस्थित होते .सुप्रसिद्ध कथा वाचिका मा.दीपा मिश्रजी,मथुरा , राष्ट्रीय पर्यावरण रक्षक तसेच वर्ल्ड रेकॉर्ड करणारे डॉ.विश्वनाथ पाणीग्रही,मथुरा यांच्या उपस्थित
हा सन्मान सोहळा 27 एप्रिल रोजी अयोध्या येथे पार पडला. उच्च शैक्षणिक योग्यता व
शैक्षणिक क्षेत्रातील भरीव कार्य ,शोधकार्य, समाजसेवा व साहित्य सृजनासाठी विद्यापीठाने त्यांची निवड केली.
यापूर्वी मंजुषा सागर यांना राष्ट्रिय प्रतिष्ठा पुरस्कार २०२३, A.I S.F. महाराष्ट्र समिती ने आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार२०२२ दिला आहे,अखिल भातीय प्राथमिक शिक्षक संघ द्वारा सावित्रीच्या लेकी पुरस्कार २०२२,निर्धार महिला बालकल्याण पुरस्कार नागपूर २०१५, पुरस्कार मिळाले आहे.सर्वस्तरातून त्यांचे अभनंदन व कौतुक करण्यात येत आहे.
