अग्निशमन वाहन यंत्रांचा आमदारांच्या हस्ते लोकार्पण

राळेगाव ग्रामपंचायतला नगरपंचायतीचा दर्जा मिळाल्या पासून शहरवासीयांकडून अग्निशमन उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी केली जात होती ती मागणी लक्षात घेता आमदार मा. प्राचार्य डॉ. अशोक उइके यांनी वारंवार पाठपुरावा करून १ कोटी ५ लाख रुपयांचे अग्निशमन वाहन उपलब्ध करून दिले असून आज दिं १२ जून २०२४ ला क्रांतिचौक येथे अग्निशमन वाहन यंत्रणेचा लोकार्पण सोहळा प्राचार्य आमदार अशोक उईके यांच्या हस्ते करून हे अग्निशमन वाहन राळेगाव नगरपंचायतीला हस्तांतरित करण्यात आले. यावेळी लोकार्पण सोहळ्याला मुख्याधिकारी अनुप अग्रवाल, नगराध्यक्ष रवींद्र शेराम, भाजपा तालुका अध्यक्ष चित्तरंजन कोल्हे, शहर अध्यक्ष कुणाल भोयर, माजी सभापती प्रशांत तायडे, नगरसेवक मंगेश राऊत, नगर सेवक दिलीप दुधगिकर, अश्विनी लोहकरे,मोहनी बोबडे,पुष्पा कन्नाके, ज्योत्स्ना राऊत,तसेच किशोर जुणूनकर,संदीप तेलंगे, गोपाल मशरू,शुभम मुके, विनायक महाजन, विवेक गवळी, आदी पदाधिकारी कार्यकर्ते व इतर मान्यवर हजर होते.