सुशगंगा पब्लिक स्कूलमध्ये जागतिक कर्करोग दिन साजरा

स्वावलंबी शिक्षण संस्था वणी द्वारा संचालित सुशगंगा पब्लिक स्कूलच्या प्रांगणात जागतिक कर्करोग जागृती दीन साजरा करण्यात आला. दरवर्षी ४फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग दीन जगभरात साजरा केला जातो
याप्रसंगी शाळेचे प्राचार्य श्री प्रवीण दुबे यांनी जागतिक कर्करोग दीन साजरा करण्यामागचा उद्देश हा लोकांना कॅन्सरबद्दल जागरूकता निर्माण झाली पाहिजे, भारतात सर्वाधिक वेगाने वाढनारा आजार म्हणजे कॅन्सर आहे, मात्र आजही कॅन्सरबद्दल लोकांमध्ये जनजागृती नसल्याचे दिसून येत आहे, यांची प्रमुख कारणे म्हणजे आपली बदललेली जीवनशैली, प्राणघातक आणि धोकादायक आजाराबद्दल जागरूकता असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले, या कार्यक्रमाचे सफल आयोजन इयत्ता सहावीच्या विध्यार्थीनी केले, कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले,