

देशात महिला अत्याचारांच्या संख्येत सातत्याने वाढ : रोहिणी बाबर
सहसंपादक : रामभाऊ भोयर
वर्धा जिल्ह्यातील अखिल भारतीय मराठा महासंघ महिला आघाडी आणि युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने कोलकत्ता आणि बदलापूर येथिल घटनांचा निषेध करत फास्ट ट्रक कोर्टात ही प्रकरणे चालवून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी याकरिता वर्धा जिल्ह्याधिकाऱ्यां मार्फत फाशीच्या मागणीचे निवेदन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी , महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पाठविण्यात आले. देशात महिला अत्याचारांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. महिलांची सुरक्षितता धोक्यात आली आहे.घडलेल्या घटना या अतिशय दुर्दैवी असून तपासात होत असलेली दिरंगाई हीच पुरावे नष्ट करण्यास कारणीभूत होते आणि यामुळे लोक प्रक्षुब्ध होऊन जनक्षोभाचा उद्रेक होतो.शाळेत सुद्धा मुली सुरक्षित नसून घडलेल्या घटना या अमानवीय कोर्याच्या परिसीमा गाठणाऱ्या आहेत. आरोपीनां कायद्याचा धाक राहिलेला नसल्याने दिवसेंदिवस माणसामधील विकृती वाढत आहे. अशा विकृतीला आळा बसण्याकरिता ठोस कायद्यांची निर्मिती अथवा स्त्री सुरक्षिततेकरिता निर्माण केलेल्या “शक्ती” कायद्यास मान्यता देवून त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी अश्या आग्रही मागणीचे निवेदन मराठा महासंघ विभागीय उपाध्यक्षा रोहिणी बाबर आणि युवा ग्रामीण पत्रकार संघाचे शहर अध्यक्ष तुषार रेड्डीवार यांच्या नेतृत्वात करण्यात आली. निवेदन देते वेळी घोषणाबाजी करीत घटनेचा निषेध नोंदविण्यात आला.यावेळी मराठा महासंघाच्या जिल्हाध्यक्षा मनीषा निकम,शहराध्यक्षा साधना पवार,नीलिमा जांभुळकर,धनश्री भांडेकर,नलिनी धानोरकर, मनीषा घुसे,स्वप्ना वानखेडे,आशा बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा नीता पांगुळ व युवा ग्रामीण पत्रकार संघाचे शेतकरी योद्धा अमोल ठाकरे , ताराचंद ढगे , कृष्णा काकडे , शंकर पचारे , युसुफ पठाण तसेच इतर लोकांनी सहभाग घेत उपस्थिती होती.
