
सहसंपादक : रामभाऊ भोयर
बेंबळा कालवे प्रकल्पाची राळेगाव वितरिका एल १ दुरुस्त नसल्यामुळे तसेच या वितरिकेमध्ये ठिकठिकाणी झाडाची झुडपे वृक्षवेली वाढल्याने व ठीक ठिकाणी सिमेंट ची कामे न झाल्याने पाणी लिकेज होत असल्याने राळेगाव खंड २ भागातील शेतकऱ्यांना बेंबळा प्रकल्प पाण्याची १५ वर्षांपासून प्रतीक्षाच आहे या भागातील किमान २०० शेतकरी गेल्या १५ वर्षापासून बेंबळाच्या पाण्यापासून व सिंचनापासून वंचित आहे .त्यामुळे राळेगाव वितरिका एल १ दुरुस्त करून द्यावी व काही ठिकाणी सिमेंटचे कामे करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे कारण सिमेंटची कामे न झाल्याने पाणी वितरिकेत जात नाही ही दुरुस्ती केल्यास किमान ७०० हेक्टर शेती सिंचनाखाली येऊ शकते व येथील शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ मिळू शकतो परंतु वारंवार लेखी निवेदन देऊन सुद्धा बेंबळा प्रकल्प अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचे लक्षात येते याबाबत परत एकदा राळेगाव खंड २ मधील बेंबळाच्या पाण्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांनी लेखी निवेदन उपविभागीय अधिकारी विशाल खत्री यांना दिले आहे………………… सिंचनाकरिता पाणी द्या अन्यथा शेतातून गेलेली वितरिका बुजूवून टाकू………. राळेगाव खंड २ मधील शेतकरी आक्रमक झाले असून गेल्या पंधरा वर्षापासून यांच्या शेतात राळेगाव एल वन वितरिकेचे काम झाले ठीक ठिकाणी पाठ साऱ्या झाल्या परंतु अद्याप पर्यंत बेंबळा प्रकल्पाच्या पाण्याचा या शेतकऱ्यांना लाभ झाला नाही एकही थेंब गेल्या पंधरा वर्षापासून शेतकऱ्यांना मिळाला नाही त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले असून एक तर सिंचनाकरता पाणी द्या अन्यथा आमच्या शेतातून गेलेली वितरिका आम्ही बुजवून आमचे शेत ताब्यात घेऊ अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे……………… पाणी वाटप समितीला निवेदन…….. या भागातील पाणी वाटप संस्थेने शेतकऱ्यांची सभा घेतली असून या सभेत राळेगाव वितरिका एल वन दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे या पाणीवाटप संस्थेने मार्गदर्शन करण्याकरता शेतकऱ्यांना बोलावले होते परंतु संबंधित अधिकारी मात्र सभेला आलेच नाही त्यामुळे शेतकरी अधिक संतप्त झाले…………….. बेंबळा प्रकल्पाचे पाणी १३० किलोमीटर धावते परंतु राळेगाव परिसरातील वितरिका नादुरुस्त असल्यामुळे शेकडो शेतकरी या पाण्यापासून वंचित आहे त्यामुळे फक्त १३० किलोमीटर पाणी नुसते वाहत जाते त्याचा उपयोग प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांना होताना दिसत नाही त्यामुळे हा दावा फोल असल्याचे मत किशोर या शेतकऱ्यांने केले आहे….. ………. याबाबत राळेगाव खंड २ मधील शेतकऱ्यांनी लेखी निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देऊन या वितरिकेची पाहणी करावी अशी मागणी केली आहे यावेळी किशोर उमरकर चंद्रकांत केवटे प्रथमेश ढोरे अशोक पिंपरे गजनान महाजन बंडू निखाडे दीपक होले भास्कर चांदोरे दिलीप कन्नाके रोशन पिंपरे इत्यादी शेतकऱ्यांची उपस्थिती होती
