
सहसंपादक : रामभाऊ भोयर
महाराष्ट्र राज्य कृषि सहाय्यक संघटनेने आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात आंदोलन पुकारले होते त्या अनुषंगाने संघटनेस १० फेब्रुवारी २०२५ रोजी विविध मागण्या संदर्भात शासनाने बैठकीस बोलावून कृषी सहायकाच्या मागण्यांची सोडवणूक पंधरा दिवसात करणार असल्याचे आश्वासन दिले होते परंतु अद्यापही मागण्या मान्य झाल्या नसल्याने आज आज दिं ७ एप्रिल २०२५ रोज बुधवार ला राज्यस्तरीय आंदोलन अंतर्गत विविध मागण्यांकरिता महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटना तालुका शाखा राळेगाव च्या वतीने कृषी कार्यालय समोर एक दिवसीय धरणे आंदोलन पुकारले.
कृषी सहाय्यकाच्या विविध मागण्या संदर्भात आंदोलन पुकारले असून कृषी सहाय्यकाच्या असलेल्या ११
प्रलंबित मागण्यांची तात्काळ सोडवणूक करावी अन्यथा नाईलाजास्तव कृषि सहायक संघटना
दि. ०८/०५/२०२५ रोजी एक दिवस कृषि सहाय्यक सामुहिक रजेवर जातील.
दि. ०९/०५/२०२५ पासून सर्व Online कामकाजावर बहिष्कार टाकतील. यानंतरही कृषि सहाय्यक यांच्या प्रलंबित मागण्यांची सोडवणूक न झाल्यास
दि. १५/०५/२०२५ रोजी पासून सर्व योजनेच्या कामकाजावर बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात येईल. असा इशारा यावेळी धरणे आंदोलनात देण्यात आला असून या आंदोलनात राळेगाव तालुका कृषी कार्यालयातील कृषी सहाय्यक (सेवक) सहभागी झाले होते
