बिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत करंजी येथील कुख्यात गुंड एक वर्ष स्थानबद्ध
बिटरगांव( बु )पोलीस स्टेशनची कारवाई


प्रतिनिधी शेख रमजान बिटरगांव ( बु )


बिटरगांव ( बु ) पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या करंजी येथील कुख्यात गुंड रघुनाथ दत्ता माणिकवाड यांच्यावर एम पी डी ए अंतर्गत प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकारी यांच्या कडे सादर केला आसता जिल्हा धिकारी यांनी त्याला एक वर्ष स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला.
सदरचे आदेश प्राप्त होताच बिटरगांव ( बु ) पोलीस स्टेशन ठाणेदार सुजाता बन्सोडे यांनी त्यास शोधण्यासाठी विविध पथके तयार केली आणि त्याचा शोध घेतला. शोधाअंती दि.29/8/23 रोजी रात्री तो इस्लापूर जिल्हा नांदेड येथे मिळुन आल्याने, त्यास स्थानबध्द आदेश बजावून स्थानबध्दते अंतर्गत अटक करण्यात आली.
रघुनाथ दत्ता माणिकवाड याच्या विरुध्द बिटरगांव ( बु ) पोलीस स्टेशन येथे चारी करणे दुखापत करणे, शिवीगाळ करणे स्वतःच्या आईस जीवे मारण्याचा प्रयत्न करणे आर्मक्ट या सारखे गुन्हे दाखल आहेत गणेश उत्सव दुर्गा उत्सव धमचक्र परिवर्तन दिन या कालावधीकरीता हद्दपार केले होते. त्याच्या विरुध्द चॅप्टर केसही करण्यात आली होती. तरीही त्याच्या गुन्हेगारी कारवाया त्याने थांबविल्या नाही आणि कायद्यास न जुमानता, त्याने त्याची गुन्हेगारी कृत्यु सुरुच ठेवली. त्याच्या गुन्हेगारीस बळी पडलेले सर्व सामान्य लोक त्यास घाबरून पोलीस ठाण्यास तक्रारही देत नव्हते.
या पार्श्वभुमीवर मा. पोलीस अधिक्षक डॉ. पवनकुमार बनसोड यांच्या मागदर्शनाखाली ठाणेदार सुजाता बन्सोडे सादर केलेल्या प्रस्तावास अनुसरुन सराईत गुन्हेगार रघुनाथ दत्ता माणिकवाड याला एक वर्ष स्थानबध्द करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले.
बिटरगांव ( बु ) पोलीस स्टेशन अंतर्गत तिसरी कार्यवाही असुन या पूर्वी सन 2022/23 मध्ये तत्कालीन ठाणेदार प्रताप भोस येथे कार्यरत असताना अशा कारवाईसाठी दोन प्रस्ताव सादर केला होता आणि कायद्यान्वये दोघांनाही एक वर्षा करीता स्थानबध्द करण्यात आले
मा. पोलीस अधिक्षक डॉ. पवन कुमार बनसोड यांच्या आदेश व मार्गदर्शनाखाली तसेच मा पियुष जगताप अपर पोलीस अधिक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी प्रताप पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाईत बिटरगाव पोलीस स्टेशन ठाणेदार सुजाता बन्सोड सराईत गुन्हेगारांविरुध्द ठोस कारवाई करण्याची मोहीम या पुढेही सुरुच ठेवणार असल्याचे सांगण्यात आले.
बिटरगांव ( बु ) पोलीस स्टेशन अंतर्गत चालू असलेल्या एम पी डी ए च्या कार्यवाहीने गुन्हेगारी करणाऱ्या व्यक्ती च्या मनात चांगलीच धसकी भरल्याचे दिसत आहे.