
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
भारतातील एकमेव सितामंदिर श्री क्षेत्र रावेरी येथे सितामाता मूर्ती प्रतिष्ठापणा सोहळा दिनांक 2 नोहेंबर ते 5 नोहेंबर या कालावीमध्ये सीतामाता
मूर्ती प्रतिष्ठापणा उत्सव समिती व समस्त गावकरी मंडळींनी आयोजित केला आहे
दिनांक 2 नोहेंबरला तेलंगणा _ आंध्रप्रदेश येथुन मूर्तीचे आगमन राळेगाव येथील गणेशनगर मधील श्री साई मंदिरात झाले, व पुजा अर्चा करुन सायं. ५ वाजता भजन पूजन, दिंडी, बँड पथकाच्या गजरात भव्य दिव्य मिरवणुकीला प्रारंभ झाला, यात अनेक गावातील भजनी मंडळे उत्स्फूर्त सहभागी झाले होते, त्यानंतर रावेरी नगरीत मातेच्या मूर्तीचे आगमन होताच गावातील मंडळींनी रस्त्याच्या दुतर्फा केलेली रांगोळीची सजावट व संपूर्ण गावकऱ्यांनी केलेली एकच गर्दी व त्यात काढलेले मिरवणूक गावकऱ्यांनी याची देही याची डोळा साठवून ठेवली,
सायंकाळी दिव्याच्या आरसात व संकल्प मनोकामना घट आरसात मंदिर परिसर फुलून गेला होता हा नयन रम्य सोहळा पाहण्याकरिता पंचक्रोशीतील भाविकांची उपस्थिती लक्षणीय होती सायंकाळी 7 वाजता महारुद्र अभिषेक कमल पुष्प व बेलपत्र यांचा करण्यात आला, सीतामाता संकल्प घट व मनोकामना ज्योत सोहळा पार पडला ,त्यानंतर महाआरती करण्यात आली, महाआरतीला जमलेल्या अलोट गर्दीने उपस्थित यांची मने जिंकली .
रात्री 8/30 वाजता श्री एकनाथ महाराजांचे संगीतमय भारुड श्री गणेश जी शिंदे नेरी यांनी तुफान असे सादर केले व शेवटी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व ह. भ. प. पटाईत महाराज यांना श्रद्धांजली अर्पण करून पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमाची सांगता झाली, दिनांक 3 , 4 तारखेपर्यंत होम हवन अभिषेक व दिनांक 5 नोव्हेंबरला मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होईल.
