शिवसेना उपतालुका प्रमुख पदी मनोजभाऊ भोयर यांची निवड


राळेगांव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)


वडकी जिल्हा परिषद गटाच्या शिवसेना राळेगांव उपतालुका प्रमुख पदी मनोजभाऊ नानाजी भोयर यांची नियुक्ती जिल्हा प्रमुख राजेंद्रभाऊ गायकवाड यांनी केली आहे. 
शिवसेना पक्षाचे कट्टर शिवसैनिक म्हणून मनोजभाऊ भोयर ओळखले जात असून,गेल्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबविले असून,याचा लाभ अनेक गरजवंताना झाला आहे हे विशेष..
तालुक्यात शिवसेना पक्ष वाढी साठी सातत्याने प्रयत्नरत राहू अशी प्रतिक्रिया नियुक्ती नंतर मनोजभाऊ भोयर यांनी लोकहीत महाराष्ट्र शी बोलताना दिली आहे…