
सहसंपादक: रामभाऊ भोयर
आपल्या लेखणीतून जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडून तळागळातल्यांचा आवाज शासन दरबारी पोहोचून सदैव न्याय देण्याची भूमिका जोपासत असलेले व पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट कार्याबद्दल राष्ट्रपाल मुद्रका वामन भोंगाडे यांना माणिक रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
या पुरस्कार प्रदान सोहळ्या प्रसंगी मा. खासदार प्रतिभाताई धानोरकर चंद्रपूर वणी लोकसभा, मा. संजय देरकर आमदार वणी विधानसभा, मा. वामनराव चटप माजी आमदार राजुरा, मा. किरण ताई संजय दरेकर अध्यक्ष एकविरा नागरी पतसंस्था वणी, मा. प्रा. मोहनजी वडतकर वर्धा, डॉ. रेखा निमजे नागपूर संचालिका नागपूर, लक्ष्मण गमे सर्वाधिकारी गुरुकुंज आश्रम मोझरी, मधुसूदन कोवे गुरुजी अध्यक्ष ग्रामस्वराज महामंच, गिरीधरजी ससनकर, देवराव धांडे शेतकरी नेते वणी तसेच प्रा. डॉ. गावंडे. प्रा. राजेश कापसे वर्धा आदी मान्यवरांच्या उपस्थितीत विठ्ठल रुक्मिणी मंदिर वणी येथे दिं.१९ जानेवारी २०२५ रोज रविवारला तुकड्याची झोपडी स्मरणिका प्रकाशन सोहळ्यात राष्ट्रपाल भोंगाडे व त्यांची अर्धांगिनी प्रगती भोंगाडे यांना माणिक रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला असून त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून पत्रकार राष्ट्रपाल भोंगाडे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.