
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील वरुड जहांगीर येथील बंजारा वस्तीला एक सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर आणि एक थ्री फेज ट्रान्सफॉर्मर पंपासाठी दिले असून गेल्या चार दिवसाअगोदर थ्री फेज ट्रान्सफॉर्मर जळले होते याबाबत विद्युत वितरण कंपनी कार्यालय झाडगाव अंतर्गत वरूड जहांगीर कार्यरत असलेले कर्मचारी कपिल नहाते यांना सांगितले असतांना नहाते यांनी लगेच वरीष्ठ अधिकारी यांना माहिती दिली असल्याचे सांगितले त्यांनतर या कामासाठी परत तीन दिवसापासून वरूडचे ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आले नाही.त्यानंतर झाडगाव येथील अभियंता यांच्याशी संपर्क साधला सोबतच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अरविंद वाढोणकर यांनी Executive engineer यवतमाळ चव्हाण साहेब यांना फोन करून समस्या सोडविण्यासाठी सांगितले असता यवतमाळ येथील अधिकारी चव्हाण यांनी तातडीने कारवाई करून ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आले.परंतु या ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी आलेल्या ठेकेदाराच्या कामगारांकडून वागणूक बरोबर न मिळाल्याने गावकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून ठेकेदारानी आपल्या कामगारांना तशा प्रकारची सुचना द्यावी अशी प्रतिक्रिया मयूर राठोड, प्रविण वडते, सौरभ वडते,प्रकाश जाधव, विष्णू राठोड,आकाश जाधव, गोलू जाधव गोलू वडते प्रकाश चव्हाण शुभम चव्हाण, राहुल वडते, तुषार राठोड यांनी दिली असून त्यांच्यात सुधारणा करावी अन्यथा एक म्हण लक्षात ठेवावी. गाव करे सो राव ना करे . असा प्रकार पुढे घडणार नाही अशी ताकीद द्यावी सोबतच या शेतकऱ्यांच्या महत्वाच्या वेळी विद्युत वितरण कंपनीकडून ताबडतोब सेवा उपलब्ध द्यायला हवी असताना या कामाला विलंब का असा प्रश्न उपस्थित होत असून घरगुती ट्रान्सफॉर्मर सुद्धा नादुरुस्त असल्याचे तांड्यातील बंजारा बांधव सांगत असून संबंधित विभागाने वेळीच हा ट्रान्सफॉर्मर तपासून त्यावर योग्य ती कारवाई करून गावकऱ्यांना दिलासा द्यावा आणि ठेकेदाराच्या कामगारांना ताकिद द्यावी अशी विनंती करून उशीरा का होईना पण विवंचनेतून मुक्त केल्याबद्दल ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अरविंद वाढोणकर, यवतमाळ येथील विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी चव्हाण साहेब , झाडगाव कार्यालयाचे इंजिनियर चव्हाण साहेब, लोहे साहेब,आणि महत्त्वाचं म्हणजे माझ्या पत्रकार बांधवांनी प्रसिद्धी देऊन गावातील लोकांना समस्या सोडविण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राळेगाव तालुका प्रसिद्धी प्रमुख तथा खरेदी विक्री संघाचे संचालक श्रावनसिंग वडते सर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
