
राळेगाव तालुका प्रतिनिधी :- रामभाऊ भोयर (9529256225)
महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या दुसऱ्या लाटेमुळे दोन महिने एसटी प्रवास बंद ठेवण्यात आला होता परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच बससेवा सुरू झाली मात्र एसटी प्रवास करताना प्रवाशांनी मास्क लावणे बंधनकारक आहे तशी सूचना एसटीच्या दर्शनी भागात लावण्यात आलेली आहे मात्र या सूचनेकडे दुर्लक्ष होत असून अनेक प्रवासी विनामास्क प्रवास करतांना दिसून येत आहे त्यामुळे आणखी कोरोनाला आमंत्रण मिळण्याची भीती निर्माण झाली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या वाढत्या संसर्गामुळे पुन्हा राज्यात लॉकडाऊन घोषित करून जनजीवन ठप्प झाले होते या लाटेत सर्वात जास्त ग्रामीण भागात नुकसान झाल्याचे दिसून आले लहान लहान गावे हॉटस्पॉट ठरली कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस पुन्हा रस्त्यावर धावू लागल्या कोरोना जनजागृती करण्यासाठी मोठे ठळक बॅनर फलक बसेसच्या मध्यभागी मास्क नाही तर प्रवेश नाही अशा मार्ग दर्शन सूचना लिहिली आहेत मात्र तरीदेखील काही प्रवाशांच्या तोंडावर मास्क दिसून येत नाही तर काहीजणांचा मास हनुवटीवरच लावलेला असतो यामुळे या सूचनांकडे नागरिक तसेच प्रवाशांचे दुर्लक्ष होत असून त्यांना गांभीर्य दिसून येत नाही कोरोनामुळे मोठी हानी होऊन देखील यातून आपण अजूनही काहीच बोध घेतला नाही असेच म्हणावे लागेल यात प्रत्येक प्रवाशाने जवळ मास्क सॅनिटाइजर ठेवणे बंधनकारक देखील करण्यात आले आहे मात्र या नियमांचे काटेकोर पालन होताना दिसून येते नाही यासाठी एसटी महामंडळकडून कडक अमल बजावणी करावी अशी मागणी काही प्रवाशांकडून केली जात आहे.
