
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बोद्ध महासभा तालुका शाखा कळंब द्वारा प्रथम स्त्री शिक्षिका क्रांतीज्योती
सावित्रीबाई फुले यांची जयंती तक्षशीलाबुध्दविहार कळंब (माथा )येथे प्रबोधनात्मककार्यक्रमाने साजरी करण्यात आली. बेबीबाई वानखडे व कुसुमबाई मुजमुले यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली.सावित्रीबाई फुले ज्यांनी पुरुषप्रधान समाजाला हादरा दिला व समतेची प्रतिमा मांडली, जिथे महिलांना केवळ सन्मान मिळाला नाही, तर जीवन जगण्याचा नवा मार्गही सापडला. असे प्रतिपादन भारतीय बोद्ध महासभेच्या केंद्रीय शिक्षिका उज्वलाताई भवरे यांनी व्यक्त केले. कु.सम्राज्ञी भस्मे, कु.आर्या बलवीर, प्रज्ञा चतुरपाळे, कु.अप्पी चतुरपाळे,कबीर घाटोळे या छोटयानी सावित्रीबाई फुले यांच्या संघर्ष व त्यागामुळेच आज महिला सर्वच क्षेत्रात आघाडी घेत असल्याच दिसून येत आहे असे विचार मांडले. कु.सम्राज्ञी भस्मे या मुलीचं ” होय मी सावित्रीबाई ज्योतिबा फुले बोलतेय.” हे एकपात्री नाट्य कार्यक्रमाचं विशेष आकर्षण ठरलं.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माता रमाई परिसरातील सर्व महिलांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाला परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सुंदर संचलन कोमल घाटोळे यांनी केले व आभार अरुणा बलवीर यांनी मानले.
