
सहसंपादक:- रामभाऊ भोयर
शेतकऱ्यांच्या पाठीमागे लागलेला संकटाचा ससेमीरा संपायाचे नाव घेत नाही. कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकट त्याची परीक्षा पाहण्यास सज्ज आहे. अशाच एका सुलतानी तुघलकी व्यवस्थेचा फटका ऐन पेरणी च्या काळात शेळी येथील शेतकऱ्याना बसला. तालुक्यातील शेळी (माड) येथील विजय नानाजी ठाकरे यांच्या शेतात सारण्या पाडत असतांना विजेचा धक्का लागून एक बैल जागीच ठार झाल्याची दुर्देवी घटना घडली.
ऐन हंगामाच्या तोंडावर बैल मृत्यूमुखी पडल्याने शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. विशेष म्हणजे महावितरण कपंनी च्या हलगर्जीपणा मुळे या शेतकऱ्यावर बैल गमावण्याची वेळ आल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. अंदाजे 60 ते 70 हजाराचा हा बैल होता. या बाबत समंधीतांनी राळेगाव पोलीस स्टेशन ला तक्रार दिली असून कारवाई ची मागणी करण्यात आली आहे.
