
पावसाळा सुरू असल्याने उपजिल्हा रुग्णालय वरोरा मागील एका वृद्ध ,निराधार महिला उघडयावर झोपत असल्याचे मित्र सेवा ग्रुप च्या सदस्यांना लक्षात आले .त्यामुळे त्या वृद्ध महिलेला मदत करायची असा निर्धार मित्र सेवा ग्रुप च्या सदस्यांनी केला.त्यानुसार आज दिनांक 17 जुलै ला एक बेड, गादी व खाऊची मदत
केली आहे. या वेळी ग्रुप चे शरद पूरी, अनिकेत श्रीरंग,आकाश रदंळे , शाहरुख शेख,
यश देडगे, जय नैताम, संस्कार कोरेकर , ओम बरडे, पियूष ढवस,
कुंदन मेश्राम आदी सदस्य उपस्थित होते.
