
धोपटाळा येथील हृदय हेलकावून टाकणारी घटना…
धोपटाळा र्विहिरीच्या काठावर बसून गावाखेड्यात गप्पा मरण्याच्या सवयी आहे, मात्र ह्या सवयी कधी जिवावर बेतेल याचा नेम नाही अशीच घटना वणी शहारा पासून हाकेवर असलेल्या धोपटाळा येथे घडली.विहिरीच्या काठावर बसून नेहमी प्रमाणे गप्पा मारत असताना २५ वर्षीय तरुणाचा तोल गेला, आणि तो विहिरीत पडला यात त्याचा मृत्यू झाला. ही घटना शनिवार दि. २८ जानेवारीला रात्री तालुक्यातील धोपटाळा येथे घडली.
चेतन शंकर घोसरे (२५) असे दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. तो धोपटाळा येथील निवासी आहे. घटनेच्या दिवशी तो आपल्या काही मित्रां सोबत विहरीवर बसलेला होता. गप्पा रंगात आलेल्या असतानाच अचानक त्याचा तोल गेला व तो विहिरीत पडला.यावेळी त्याच्या मित्रांनी आरडाओरडा केला, पण त्याला वाचविण्यासाठीचे प्रयत्न निष्फळ ठरले. ही बाब घरच्या मंडळींना कळली ते धावतच घटनास्थळी दाखल झाले मात्र बराच उशीर झाला. या घटने बाबत पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात आणला होता. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.
