शेतकऱ्यांना लागले अतिवृष्टी च्या मदतीचे वेध


प्रतीनिधी :प्रवीण जोशी ,ढाणकी


उमरखेड तालुक्यातील ढाणकी मंडळातील शेतकऱ्यांना आता अतिवृष्टी च्या मदतीचे वेध लागले असून शेतकरी मोठ्या आशेत असल्याचे दिसून येत आहे गेल्या जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते यामुळे शासनाने पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे सांगितले त्याच अनुषंगाने जिल्ह्याला निधी सुध्दा प्राप्त झाले आहे मात्र शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा होण्यास विलंब होत असल्याने शेतकरी अपेक्षित असल्याचे दिसून येत आहे. आता प्रशासनाने शेतकऱ्यांच्या खात्यात कधी नुकसान भरपाई ची रक्कम जमा करणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
चौकट __ अतिरिक्त पाण्यामुळे माझ्या शेतातील ज्या प्रमाणात सोयाबीनचे पीक यायला पाहिजे ते मुळीच आले नाही व कापसाला सुद्धा फटका बसला त्यामुळे शासनाने तत्काळ मदत करावी जेणेकरून रब्बी हंगामाला हातभार लागेल.. दिलीप जाधव शेतकरी कृष्णापूर