
महागाव प्रतिनिधी:- संजय जाधव
फुलसावंगी केंद्रात केंद्रीय शालेय स्पर्धा नुकत्याच पार पडल्या.या स्पर्धेत केंद्रातील सर्व शाळा सहभागी झाल्या होत्या.त्यात चिंचोली येथील जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांनी कबड्डी (मुले) या खेळत प्रथम क्रमांक पटकावला तसेच लंगडी(मुली) यांनी देखील प्रथम क्रमांक पटकाविला.विद्यार्थांनी घेतलेल्या मेहनतीचे हे यश आहे, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खेळात आवड निर्माण व्हावी.तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय स्तरावर नेतृत्व करण्याची क्षमता आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांनी शालेय अभ्यासक्रमा बरोबर खेळाकडे लक्ष द्यावे.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक व्हि.पि.कांबळे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी शिक्षक व्ही.बी.कपाटे,व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितीन उत्तम राठोड,यासह गावकरी उपस्थित होते.यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
