नुसत्याच विकासाच्या “बाता” सच्चाई मात्र काही औरच, गॅरंटी गरिबीची ऊन वारा पावसाची तमा न बाळगता जीवन जगतोय घिसडी समाज

सहसंपादक : रामभाऊ भोयर

सरकार सर्व समाजाला विविध योजनेअंतर्गत सुजलाम सुफलाम करीत असले तरी घिसडी समाजास अद्यापपर्यंत न्याय मिळाला नाही आजही हा समाज गावाच्या वेशीवर पाल ठोकून ऊन वारा पावसाची तमाबन बाळगता असह्य जीवन जगत आहे.
वीस ते पंचवीस वर्षापासून वनोजा येथे दादाराव सोळंकी पत्नी दोन मुले दोन मुली अशा आपल्या परिवारासह पाल ठोकून दिवसभर केलेल्या कामाच्या कमाईतून पोट भरायचे त्या गावातील काम संपले की आपले बिराड घेऊन दुसऱ्या गावात जावून काम करायचे व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा परंतु काही दिवसांनी दादाराव सोळंकी यांची लहान लहान मुले असताना दादाराव सोळंकी याहे हृदय विकाराने निधन झाले त्यांच्या निधनानंतर सोळंकी कुटुंबाचा भार त्यांच्या पत्नीवर पडला दादारावचा मोठा मुलगा दहा वर्षाच्या असतांना दादारावच्या पत्नी ने हार न मानता आपल्या मुलाला गावोगावी घेऊन कामे करून कुटुंबाचा गाडा चालविला आलेल्या कमाईतून पोटाची खळगी भरायांची त्यातही त्यांची लहान मुलेही कामात हातभार लावयांचे आता दादाराव यांच्या मुलाचे मुलीचे लग्नसुद्धा झाले मात्र २५ वर्षांपासून या दादाराव च्या मुलांना शासनाकडून कुटुंबाला कोणती मदत मिळाली नाही स्वस्त धान्य असो की घर शासनाची कोणतीही योजना या कुटुंबापासून कोसो दूर आहे आजही दादारावची दोन मुले पोटाची खळगी भरण्यासाठी गावोगावी जाऊन शेतीची अवजारे बनवून आपली उपजीविका भागू लागले त्यांना असलेली लहान मुले सोबत असल्याने मुलांना शिक्षणासाठी वेळ देता येत नसल्याची खंत या दाम्पत्यांनी केली आहे.
समाजबांधव म्हणतात प्रत्येक रात्र आमच्यासाठी वैऱ्याची असते दिवसभर कामात वेळ कसा जातो हे कळत नाही असे सांगितले आहे मात्र प्रत्येक रात्र आमच्यासाठी वैऱ्याची असते गावाबाहेर पार्ट राहतात त्यांनी रात्रीच्या वेळी विंचू साप आधी सरपटणाऱ्या प्राण्यांच्या भीतीने मुलं बाळाची चिंता भेडसावत असल्याचे त्यांनी सांगितले

पापी पोटासाठी कामाचा शोध कोणत्याही कधी कधी धोका देते
आमच्या हाल अपेष्टा झाल्या मात्र मुलांच्या तरी होऊ नये यासाठी दिवसभर घरोघरी जाऊन काही काम मिळते का याचा शोध घेत फिरतो सध्या पेरणीचे दिवस जवळ आल्याने व्यवसाय चांगला चालतो मात्र कधी कधी काम न मिळाल्यास मुलाबाळाचा उपाशी झोपायची वेळ येत असल्याचे सोळंके परिवाराने सांगितले आहे.