शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शासनामार्फत पाठवणार , हजारोंच्या संख्येने उपस्थित व्हा : अशोक मेश्राम यांचे आवाहन

सहसंपादक : रामभाऊ भोयर

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका जशा जशा जवळ येत आहे तसं तसे उमेदवार आपल्या लोकांबद्दल काही तरी देणं लागतो म्हणून कामाला लागले असून याचेच एक उदाहरण म्हणजे उच्चशिक्षित उमेदवार अशोक मेश्राम हे राळेगाव तालुक्यातील किन्ही जवादे निवासी, पोलिस विभागाच्या उच्च पदावर नोकरी करत असतानाच समाजसेवेचा वसा हाती घ्यायचा म्हणून नोकरीचा राजीनामा दिला आणि समाजसेवा करायची तर पद आवश्यक आहे म्हणून विधानसभेची निवडणूक लढू असा मानस केला असून हे उमेदवार वेगवेगळे उपक्रम राबवित आहे.त्यातलाच एक भाग म्हणून येत्या 13 सप्टेंबर रोज शुक्रवारला शेतकऱ्यांच्या ज्वलंत मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी राळेगाव यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे यांना पाठवणार असून या मागण्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी 50 हजार रुपये मदत करावी.ही मदत दोन हेक्टर पर्यंत असावी.2023 चार पिक विमा तातडीने द्या.2024-2025 या वर्षी अतिवृष्टी झाली असल्याने शेतीचे नुकसान झाले असून पिकविमा देण्यात यावा. पी.एम. किसान योजनाचे अनावश्यक कारण दाखवून शेतकऱ्यांना आर्थिक लाभापासून वंचित ठेवू नये. भुमीहिन शेतकऱ्यांना कसत असलेल्या जमिनीचे पट्टे देण्यात यावे. शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या शेती उपयोगी साहित्याचे अनुदान तातडीने देण्यात यावे. अशा एक ना अनेक मागण्यांचे निवेदन घेऊन सेवानिवृत्त पोलिस अधिकारी तथा राळेगाव विधानसभेचे उमेदवार अशोक मेश्राम शासनाला पाठविणार असून या वेळी अनेक शेतकरी शेतमजूर बंधू भगिनींनी सामिल होऊन सहकार्य करावे असे आवाहन अशोक मेश्राम यांनी केले असून आजपर्यंत झालेल्या विधानसभा निवडणुकीत निवडून येण्यापूर्वी शेतकऱ्यांसाठी लढणारा लढवय्या हे अशोक मेश्राम पहिलेच उमेदवार असल्याची शक्यता नाकारता येत नसून सर्वांनी या मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.