यवतमाळ – बहुजन विद्यार्थी फेडरेशन यवतमाळ जिल्ह्याची नविन कार्यकारिणी फेडरेशनचे जिल्हा प्रभारी प्रा.आर एम.भरत यांच्या प्रमूख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली नुकतीच घोषित कऱण्यात आली आहे. यामध्येजिल्हा पदाधिकारी म्हणून यवतमाळ जिल्हा अध्यक्ष अविनाश फुटाणे व जिल्हा उपाध्यक्ष रिया राजेश कुळसंगे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
तसेच तालुका पदाधिकारी म्हणून यवतमाळ तालुका अध्यक्ष ऋषिकेश येळके, राळेगाव तालुका अध्यक्ष अनुराग आडे, केळापूर तालुका प्रभारी वैष्णवी मेश्राम, तालुका अध्यक्ष अतूल सुरपाम, उपाध्यक्ष सुहानी पेनदोर,पुसद तालुका अध्यक्ष ओम वाघमारे, उपाध्यक्ष कुणाल मेश्राम,मारेगाव तालुका अध्यक्ष नकुल मडावी, उपाध्यक्ष प्रीति केराम्, कळंब तालुका अध्यक्ष प्रविण तिरवळे, उपाध्यक्ष करण टेकांम, वणी तालुका अध्यक्ष तुषार आत्राम, घाटंजी तालुका प्रभारी चंचल मेश्राम, तालुका अध्यक्ष रोहित गेडाम, उपाध्यक्ष सुष्ट्री पेन्दोर व झरि जामनी तालुका प्रभारी साक्षी येरमे, तालुका अध्यक्ष पूनम कोळवते, उपाध्यक्ष प्रविण टेकाम यांची तालुका पदाधिकारी म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली.