
सहसंपादक : रामभाऊ भोयर
वडकी. :राळेगाव येथील विश्रामगृह येथे दि १९ तारखेला युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांच्या मार्गदर्शनात संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष संजय कारवटकर यांचे उपस्थितीत
राळेगाव येथील शासकीय विश्रामगृह येथे तालुकास्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जिल्हा उपाध्यक्ष संजय कारवटकर यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आली होती. शशीम कांबळे यांची नवनियुक्त राळेगाव तालुका अध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली.
युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या २०२५ ते२०२६ साठी घोषित झालेल्या राळेगाव तालुका कार्यकारणी मध्ये तालुका अध्यक्षपदी शशीम कांबळे तर तालुका उपाध्यक्षपदी लोकेश दिवे व शंकर पंधरे, सचिव पदी विवेक कुमरे, कार्याध्यक्ष उमेश कांबळे, प्रसिद्धी प्रमुख अरविंद कोडापे, कोषाध्यक्ष बंडू भारसाकळे राळेगाव शहर प्रमुख सागर हीकरे सदस्य पदी महादेव टेकाम, खुशाल वानखेडे, जगदीश गोबाडे यांची निवड करण्यात आली. ही निवड युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री गणेश भाऊ कचकलवार यांचे मार्गदर्शनात जिल्हाप्रमुख लक्ष्मण टेकाडे यांच्या सूचनेवरून उपजिल्हाप्रमुख संजय कारवटकर यांच्या नेतृत्वात करण्यात आली. यावेळी युवा ग्रामीण पत्रकार संघाचे आजी व माजी सर्व सदस्य हजर होते. सर्वांनी सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे यावेळी जाहीर केले.
