
:- कार्यक्रमानिमित्त आदर्श शिक्षक मनोज वानखेडे यांचा सत्कार.
कारंजा घाडगे/प्रतिनिधी
कारंजा (घा):- वर्धा जिल्ह्यातील कारंजा येथे दिनांक १४/९/२०२२ बुधवारला अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समिती महिला शाखेची सभा संपन्न झाली.कारंजा तालुक्यात वाढत्या अंधश्रध्दावर नियंत्रण करण्यासाठी व मानव समाजा मध्ये या बद्दल जनजागृती करण्याच्या उद्देशाने अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मुलन समिती महिला शाखा कारंजा तालुका कार्यकारणी पुन्हा नव्याने गठित करण्यात आली.सर्वप्रथम राजमाता जिजाऊ यांना वंदन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली, त्यानंतर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समिती महिला शाखा तालुका संघटीका संगिता पाटील यांनी समिति आणि समितीच्या कार्यावर व विचारधारेवर आधारित माहिती दिली. यावेळी विविध पदावर महिला पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.यात अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या तालुकाअध्यक्ष पदावर प्रांजली वानखेडे यांची नियुक्ती करण्यात आली, कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी अंजली इंगळे यांच्याकडे देण्यात आली व उपाध्यक्ष पदावर कांचन गजभिये आणि सचिव पदावर प्रज्ञा पाचपोहर यांची नियुक्ती करण्यात आली.सहसंघटक पदावर वर्षा मानोहरे यांची नियुक्ती करण्यात आली.सहसचिव पदावर गीता कळस्कर व प्रसिद्धी प्रमुख पदावर संगिता कामडी यांची नियुक्ती करण्यात आली. कोषाध्यक्ष पदावर बबिता शेंडे यांची नियुक्ती करण्यात आली. अ.भा. अनिस महिला शाखेच्या मार्गदर्शक म्हणून अनिता शेटे व डॉ. मेघा कळंबे यांची नियुक्ती करण्यात आली व सल्लागार म्हणून मंदा नागले यांची नियुक्ती करण्यात आली. या कार्यक्रमानिमित्त कारंजा शहरातील आदर्श शिक्षक मनोज वानखेडे यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाला पियूष रेवतकर , विनोद पाटिल, उमेश पाचपोहर, विनोद दंडारे, मनोज वानखेडे,संगीता पाटील, अनिता शेटे,बबिता शेंडे, कांचन गजभिये, प्रांजली वानखेडे, प्रज्ञा पाचपोहर,अंजली इंगळे, संगिता कामडी,वर्षा मनोहरे, सोनू येसनकर, आम्रपाली बागडे, कविता पाटील व आदी अनेक महिला तसेच पुरूष पदाधिकारी उपस्थित होते.
