मार्कंडेय पोदार लर्न स्कूल, वणी येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा

मार्कंडेय पोदार लर्न स्कूल, वणी येथे , महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या स्मरणार्थ महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्री मार्कंडेय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री रमेश सुंकुरवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करून उत्सवाची सुरुवात झाली. त्यानंतर राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीत गायन झाले.
यावेळी बोलताना श्री.रमेश सुंकुरवार यांनी १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीच्या इतिहासावर प्रकाश टाकला.
कामगार दिनानिमित्त स्कूल बस चालक, रक्षक, शिपाई आणि प्रयोगशाळा परिचर यांचा श्री मार्कंडेय शिक्षण संस्थेचे सचिव श्री. राहुल सुंकुरवार यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना मुख्याध्यापक श्री.भूषण अलोणे यांनी शाळेतील चालक, रक्षक, शिपाई यांचे शाळेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल आभार मानले.
संचालन सौ. शुभांगी देशमुख यांनी केले तर आभार शरद तरारे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.