नेताजी विद्यालय राळेगाव तर्फे मतदार जनजागृती प्रभात फेरी

सहसंपादक : रामभाऊ भोयर

दि १५ मार्च २०२४ रोजी नेताजी विद्यालय राळेगाव येथे मतदार जनजागृती प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते.या प्रभात फेरीत विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृती संदर्भात घोषणा दिल्या या माध्यमातून समाजामध्ये मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे, मतदान सर्वांनी केले पाहिजे,मतदान करणे हे विकसित राष्ट्र उभारण्यासाठी महत्वाचे आहे समजावून सांगण्यात आले,ही प्रभात फेरी गांधी ले आऊट, तहसील चौक येथून नेण्यात आली, या प्रभात फेरीत नेताजी विद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग घेतला सदर प्रभात फेरीसाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक पी पी ओंकार यांनी मार्गदर्शन केले व सर्व शिक्षकांनी सहभाग घेतला होता.