.

यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
देशातील केंद्र सरकार व महाराष्ट्रातील राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे, पेट्रोल डिझेल सिलेंडर दरवाढ, रासायनिक खते दरवाढ, योजनेतून झालेल्या विहिरी, घरकुल यांचे पैसे या सर्व विषयांवर आधारित सर्वसामान्य माणूस मेटाकुटीला आला असून त्या अनुषंगाने दिनांक २६/०५/२०२६ रोज मंगळवारला सकाळी ठिक ११.३० मिनिटांनी उपविभागीय अधिकारी राळेगाव यांना महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री प्राध्यापक वसंतराव पुरके सर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ओबीसी सेलचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष अरविंद वाढोणकर, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राळेगाव तालुका अध्यक्ष राजेंद्र तेलंगे, शहराध्यक्ष प्रदीप ठुणे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. सोबतच पंचायत समितीच्या चालत असलेल्या भोंगळ कारभाराविषयी रोष व्यक्त केला. निवेदनातून केलेल्या मागण्यांवर शासनाने ताबडतोब तोडगा न काढल्यास परत एकदा निवेदन सादर करून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, समविचारी संघटना, घरकुल लाभधारक, विहीरीचे लाभधारक, पेट्रोल डिझेल सिलेंडर धारकांना सोबत घेऊन तिव्र आंदोलन उभारण्यात येणार असून त्या प्रसंगी होणाऱ्या अनिष्ट परिणामांना तुम्ही जबाबदार राहणार आहे.निदेदन देताना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माजी शिक्षणमंत्री प्राध्यापक वसंतराव पुरके सर, ओबीसी सेलचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष अरविंद वाढोणकर, राळेगाव तालुका अध्यक्ष राजेंद्र तेलंगे, शहराध्यक्ष प्रदीप ठुणे, राजेंद्र नागतूरे श्रावणसिंग वडते सर दिलीप दुधगिकर मंगेश पिंपरे अफसर अली श्रीधर थुटुरकर सर प्रदीप लोहकरे मधूकर राजूरकर राजू पुडके राजेश काळे अशोक काचोळे महादेव काळे कळंब अँड अनिल किन्नाके दत्तात्रय ठाकरे सचिन हुरकुंडे सैय्यद लियाकत आली नरेंद्र जयसिंगकार गजानन पाल तुषार काळे अशोक उमरतकार प्रशांत वाघमारे नामदेव हरणे गजानन पंचबुद्दे विक्की इंगळे सियाज अली भरत ठुणे अंकित कटारिया विलास दुधपोळे एम जी उमरतकार अँड सिमा तेलंगे अँड वैभव पंडित, अँड लौकिक आगलावे,रविंद्र शेराम सुधीर जवादे प्रकाश पोपट अंकुश मुनेश्वर संजय कारवंटकार योगेश घोडे सरोज सिद्दिकी यांच्या हस्ते अनेक पदाधिकारी, शेतकरी शेतमजूर व समस्याग्रस्त बंधू उपस्थित होते. उपस्थित लोकांनी शासनाच्या विरोधात घोषणा देऊन निषेध व्यक्त केला.
