
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
एमआरपी व्यवस्थेमध्ये सुधारणा करून ग्राहक संरक्षणासाठी आवश्यक कायदेशीर दुरुस्त्या करण्यात याव्या, याकरिता तालूका ग्राहक पंचायतने तहसीलदार यांना लेखी निवेदन दिले.
प्रत्येक उत्पादनावर एम.आर.पी. सोबत उत्पादन खर्च नमूद करणे अनिवार्य करण्यात यावे, उत्पादक कंपन्यांकडून मनमानी पद्धतीने एम.आर.पी. निश्चित करण्यावर कायदेशीर निर्बंध घालण्यात यावेत, योग्य व न्याय्य कमाल किंमत निश्चित करण्यासाठी स्वतंत्र वैधानिक प्राधिकरण स्थापन करण्यात यावे, संबंधित प्राधिकरणाला एम.आर.पी.ची तपासणी, पुनरावलोकन तसेच अनुचित किंमत निर्धारणावर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार प्रदान करण्यात यावेत, औषधे, अन्नपदार्थ तसेच दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंसाठी विशेष नियंत्रण व्यवस्था लागू करण्यात यावी, ग्राहकांची दिशाभूल व आर्थिक शोषण करणाऱ्या उत्पादक व विक्रेत्यांवर कठोर दंडात्मक कारवाईची तरतूद करण्यात यावी, संसद व विधानसभांमध्ये या विषयावर चर्चा करून आवश्यक कायदेशीर दुरुस्त्या तातडीने करण्यात याव्यात
त्यामुळे ग्राहकांच्या आर्थिक शोषणाला आळा घालण्यासाठी शासनाने या विषयात तातडीने हस्तक्षेप करून ठोस व प्रभावी निर्णय घ्यावा अशी ग्राहक पंचायतीने संपूर्ण देशभर मागणी केली आहे. त्याअंतर्गत ग्राहक पंचायतच्या राळेगाव तालुका शाखेचे अध्यक्ष माजी प्राचार्य मोहन देशमुख जिल्हा उपाध्यक्ष डॉ. के. एस. वर्मा, तालुका शाखेचे सदस्य माजी प्राचार्य सुरेंद्र ताठे सर व गजाननराव घुंगरूड सर यांनी माननीय पंतप्रधान यांना द्यावयाचे निवेदन तहसीलदार अमित भोईटे यांचे मार्फत एमआरपी संदर्भातील निवेदन देण्यात आले.
