खुनातील आरोपींना कठोर शिक्षा करा :- माधव देवसरकर , व्यापाऱ्यांनी शहर बंद ठेऊन केला निषेध..

हिमायतनगर प्रतिनिधी
शहरातील श्री परमेश्वर मंदिर बसस्थानक परिसरात दि. ११ सप्टेंबर रोजी भरदिवसा एका शाळकरी युवकाचा त्याच्याच वर्ग मित्रांनी खुन केल्याचा थरार सर्व तालुक्याने पाहिला होता ही घटना अतिशय चित्तथरारक होती अशा घटना या पुढे घडू नये या साठी हिमायतनगर शहरातील तालुका वासियानी या घटनेचा जाहीर निषेध करून दि 16 सप्टेंबर रोजी कडकडीत बंद ठेऊन मुक्क मोर्चा काढत पोलीस प्रशासनास मागण्याचे निवेदन दिले
या बाबत सविस्तर वृत्त असे की आज दि 16 सप्टेंबर रोजी श्री परमेश्वर मंदिर येथे समस्त तालुका वासिया कडून बस स्थानक परिसरात एक पोलीस चौकी स्थापन करण्यात यावी , खून प्रकरणातील घटनेची निपक्ष पाती चोकशी करून आरोपींना कडक शासन करावे,सी.सी.टिव्ही कॅमेऱ्यात जेवढे आरोपी आहेत त्यांना जेरबंद करावे आरोपी चे मागील 15 दिवसा पासून चे कॉल रेकॉर्ड तपासून त्यांना अटक करावे या सह आदी मागण्याचे निवेदन पोलीस उप अधीक्षक भोकर यांना निवेदन देऊन शहरातील सर्व बाजार पेठ कडकडीत बंद ठेऊ घटनेचा जाहीर निषेध केला यावेळी बोलताना स्वाभिमांनी संभाजी ब्रिगेड चे माधव देवसरकर,राष्ट्रवादी चे तालुका अध्यक्ष सुनील पंतगे,ज्येष्ठ शिवसैनिक विठल ठाकरे, शिवाजी पाटील,रामभाऊ सूर्यवंशी, गणेश राव शिंदे,विजय वळसे,विकास पाटील , डॉ.गफार कार्लेकर ,शाहीर पळसपूर कर, सह आदी जणांनी शहरात घडलेल्या घेटनेचा जाहीर निषेध करून उपस्थितांना मार्गदर्शन केले
यावेळी उपस्थित तालुक्यातील सर्व गावकरी मंडळी सह मयत यश मिराशे यांचे नातेवाईक होते