
सहसंपादक : रामभाऊ भोयर
निवडणुकीचे नामनिर्देशक पत्र भरण्याची लगबग संपली असून आता जिकडेतिकडे निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे गुलाबी थंडीत गावातील पान टपरी हॉटेल चौका सध्या निवडणुकीची चर्चा सुरू असल्याची चित्र ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे सकाळ संध्याकाळ राजकीय गोष्टीचा आस्वाद घ्यायला मिळत आहे तर कापूस सोयाबीनला भाव मिळत नसल्याने शेतकर्यांमध्ये मोठा संताप निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे सध्या राळेगाव मतदारसंघात राजकीय वातावरण गरमागरम होत असल्याचे दिसत आहे. राळेगाव मतदार संघात शेतकरी शेतमजुर बेरोजगार युवक महागाई विद्यार्थी गरीब मतदार राजावर उमेदवाराचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे अशा चर्चा
गावागावात ऐकायला येत आहे उमेदवाराच्या समर्थक कार्यकत्यांमध्ये दिवसरात्र राजकीय नशा चढत आहे. महाविकास आघाडीचे वसंतराव पुरके , महायुतीचे अशोक उईके, मनसेचे अशोक मेश्राम व वंचितचे किरण कुमरे यांच्यातच हा सामना रंगणार असल्याची चर्चा आहे ही निवडणूक मात्र अटीटटीची होणार यात मात्र शंका नाही हे सर्व मातब्बर उमेदवार काय राजकीय खेळी खेळतील यावर याचे विजयाचे गणित ठरणार आहे.
