
सहसंपादक : रामभाऊ भोयर
पिंपळापूर हे गाव तालुका राळेगावातील 1500 लोकसंख्या असणारे गाव. कोणत्याही प्रकारचे सी ई टी चे क्लास न लावता स्वयं अध्ययना च्या आधारे पुनीत प्रताप भंडारी या विद्यार्थ्याने CET परीक्षेत भरघोस यश प्राप्त केले आहे .त्याचे वडील प्रताप पारसमल भंडारी हे एक शेतकरी आहेत.
एकीकडे शहराकडे पलायन करणारे विद्यार्थी, नामांकित ठिकाणी मोठ्या फी चा भरणा करून विद्यार्थी शिकवणी वर्ग लावतात तरीही विशेष काही करीत नाही ,तर दुसरीकडे कोणत्याही प्रकारचे सीईटी शिकवणी वर्ग न लावता 99.2% पुनीत भंडारी सारखे विद्यार्थी दिसतात. पालकांनी पाठवलेल्या पैशांचा अपव्यय करणारी अनेक उदाहरणे आपणास आसपास दिसतात.दुसरीकडे सोयींचा तुटवडा असूनही सर्वसामान्य परिवारातील मुले उच्च लक्ष प्राप्त करतात याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे पुनीत प्रताप भंडारी आहे, त्याच्या या यशाबद्दल गावाचे सरपंच रवींद्र चौधरी ,उपसरपंच किशोर भाऊ नहाते, प्राध्यापक शंकर मालखेडे, माजी सरपंच वसंतराव उपाते तसेच महिला बचत गट अध्यक्ष सविता निशिकांत चौधरी यांनी अभिनंदन व कौतुक केले. गावकऱ्यांनी पुनीतच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. त्याच्या यशाबद्दल स्मॉल वंडर हायस्कूल व कला वाणिज्य विज्ञान ज्यु. कॉलेज वडकी च्या प्राचार्य डॉ. मंजुषा सागर ,अहमद शेख, ,शंनो शेख,नीता फुटाणे ,विजय फुलकर , नितीन गवळी , वैभव करडे, योगिनी भोयर दामिनी फुटाणे सह समस्त शिक्षक वर्गांनी अभिनंदन केले व भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
