
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
३० नोव्हेंबर च्या रात्री दोन वाजता अवैध वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर दस्तूरखुद्द तहसिलदार अमित भोईटे यांनी पकडून तहसील कार्यालय राळेगांव येथे जमा केले आहे.
सध्या सर्व महसूल अधिकारी निवडणूक व इतर शासकीय कामात व्यस्त असल्याने, दिवाळी च्या सुट्टीचा लाभ अवैध वाळू वाहतूक तस्करांनी उचलला होता.
या संदर्भात उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी शासकीय अधिकाऱ्यांसमवेत विशेष बैठक आयोजित केली आणि अवैध वाळू तस्करी सह अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांवर कडक कारवाई सह वाहन जप्त करा अशा सूचना उपस्थित तहसिलदार, पोलिस प्रशासन व परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्यात. त्याच रात्री तहसिलदार अमित भोईटे, तलाठी सौरभ चांदेकर, निलेश देवडे, वाहन चालक सुनील कुऱ्हे यांनी करंजी येथे अवैध वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पकडल्या ने , अवैध वाळू तस्कर भांबावून गेले आहे.
या आर्थिक वर्षात राळेगाव तहसील कार्यालया मार्फत, अवैध वाळू वाहतूक करणारे सत्तावीस ट्रॅक्टर व व इतर वाहनांना पकडून तीस लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे
अशीच कडक कारवाई सातत्याने सुरु राहणार असल्याचे तहसिलदार यांनी सांगितले आहे हे विशेष…
