आयुष्याचा धागा विणता विणेना, सुई मिळेना जीवनाची; टेलरिंग संकटात

सहसंपादक : रामभाऊ भोयर

अलीकडच्या काही वर्षांमध्ये परिणामकारक बदल होऊन फॅशनेबल आणि दुकानात जाताच अंगावर फिटिंग मध्ये बसणारे रेडिमेट कपडे परिधान करण्यावर भर दिला जात आहे त्यामुळे मात्र कधीकाळी मोठी डिमांड असलेला स्थानिक स्तरावरील टेलरिंग चा व्यवसाय कोलमडला असून आयुष्याचा धागा विणता विणेना, सुई मिळेना जीवनाची, अशीच काहीशी स्थिती या व्यवसायावर विसंबून असलेल्या लोकांची झाली आहे.
साधारणतः २० ते १५ वर्षांपूर्वी लग्नकार्य सन उत्सवामध्ये नवीन कपडे शिवूनच घेण्यावर भर दिला जात असे दुकानांमधून शर्ट आणि पॅन्ट साठी लागणारा मोजका कपडा फाडून आणायचा आणि तो टेलर कडे देऊन कपडे शिवून घ्यायची पद्धत रूढ होती यामुळे शहरातील ग्रामीण भागातील टेलरिंगच्या व्यवसायातील लोकांकडे अक्षरशः लोकांची रीक लागायची त्यामुळे शिवायला टाकलेले कपडे दहा ते बारा किंवा त्यापेक्षा अधिक दिवसानंतर शिवून मिळतील असे टेलर कडून सांगितले जायचे परंतु काळाच्या ओघात चित्र पूर्णतः पालटले असून अधिकांश लोक आता रेडिमेट कपडे परिधान करण्यावर विशेष भर देत आहे त्यामुळे टेलरिंग चा व्यवसाय बहुतांशी खूपच कमी झालेला दिसून येत आहे.

पूर्वी कपडे शिवून घेणाऱ्या लोकांचे प्रमाण अधिक होते कालांतराने परिस्थिती बदलून रेडिमेटचा जमाना आला आता आमच्याकडे पूर्वीसारखी गर्दी नसते मोजके कपडे शिवायला येतात मिळेल तितक्या मिळकतीत समाधान मानावे लागत आहे

फक्त लेडीज टेलर ला बरे दिवस
शर्ट आणि पॅन्ट शिवून देण्याऱ्या टेलरला आता विशेष डिमांड राहिलेली नाही मात्र अशाही स्थितीत लेडीज टेलरला सध्या तरी बरे दिवस असल्याचे दिसून येत आहेत.
आयुष्याचे धागे उसवले
पूर्वी टेलरिंगच्या व्यवसायात चांगली मिळकत होत होती त्यामुळे मन लावून प्रशिक्षण घेतले आता मात्र कोणी कपडे शिवायला येत नाही त्यामुळे जणू आयुष्याचे धागे उसवल्याची स्थिती निर्माण झाली आहे रेडीमेड कपडे वापरण्यावर आता भर दिला जात आहे.