चातारीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा


उमरखेड प्रतिनिधी,प्रवीण जोशी.


राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात नेहमीच चर्चेत राहिलेल्या चातारी गावातील गरीब शेतकरी कुटुंबातील तरुण रवि राजु धात्रक याने सी एस आय आर नेट जे आर एफ जुनिअर रिसर्च फेलोशिप गणित विषयामध्ये 179 ऑल इंडिया रँक असे यश मिळवलेआहे. असिस्टंट प्रोफेसर म्हणून तो पात्र झाला आहे.
अठरा विश्व दारिद्र्य शेतीशिवाय दुसरा उदरनिर्वाहाचा कोणताही पर्याय नाही. शेतीही निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून असलेली. त्यामुळे कधी पिकणार कधी नाही पिकणार अशा शेतकऱ्यांना आपल्या मुलांचा शैक्षणिक खर्च करणेही आज अवघड होऊन बसलेले आहे अशावेळी स्वकष्टावर परिस्थितीची दोन हात करत रवीने केलेल्या मेहनतीचे फळ त्याला मिळाले आहे.
1960 च्या दशकापासून चातारीत हायस्कूल आहे. त्यामुळे परिसरातील व बंदी भागातील अनेक विद्यार्थी येथे शिकून मोठ्या पदावर गेलेले आहेत. विशेष म्हणजे चातारीतील जिल्हा परिषदेच्या प्रार्थमिक मुलांची व मुलींची दोन्ही शाळा आजही चांगल्या संख्येने व चांगल्या पद्धतीने चालत आहेत. त्यासोबतच इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतचे हायस्कूलचे शिक्षण देखील गावातच मिळत असल्यामुळे गरिबांच्या विद्यार्थ्यांसाठी ही मोठी पर्वणी आहे .याच जिल्हा परिषदेच्या व गावातील हायस्कूलमध्ये शिकून रवीने केलेल्या प्रगतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.