न्यू इंग्लिश हायस्कूल कडून राज्यस्तरीय टेनिस हॉलिबॉल स्पर्धाकांचा सत्कार, शाळेचे दोन संघ एकाच वेळी विजयी झाल्या बद्दल संघाची विजयी रॅली

सहसंपादक: रामभाऊ भोयर

क्रीडा व युवक संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे, अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी नांदेड व महाराष्ट्र राज्य टेनिस हॉलिबॉल असोसिएशन यांच्या शालेय राज्यस्तरीय 14 वर्ष वयोगटातील.मुले व 17 वर्ष वयोगटातील मुले टेनिस हॉलिबॉल मैदानी स्पर्धा सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय, नांदेड येथे दिनांक 4 फेब्रुवारी रोजी पार पडली यामध्ये यवतमाळ जिल्ह्यात मैदानी स्पर्धेत आपला दबदबा असणारे राळेगाव येथील न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथील 14 वर्ष वयोगटातील मुले व 17 वर्ष वयोगटातील मुले असे दोन संघ झालेल्या अंतिम स्पर्धेत एकाच वेळी विजेते ठरले. यामध्ये शाळेतील राज्य स्तरिय टेनिस हॉलिबॉल विजयी 14 वर्ष संघात खेळाडूं म्हणून मंथन ठाकरे, जयकांत शिखरे, पियुष देशमुख, यश सावरकर, आदर्श गाडगे मनीष एकोणकर हे विद्यार्थी खेडाळू म्हणून उपस्थित होते. तर शाळेतील राज्यस्तरिय टेनिस हॉलिबॉल विजयी 17 वर्ष वयोगटातील मुलांच्या संघात खेळाडूं म्हणून लकी राऊत, हिमांशू लढी, वेदांत बोदडे , अर्पित राऊत, सोहम साळवे, यश ढगले, हे खेडाळू उपस्थित होते. शाळेतील हे दोन ही विजयी संघ आता टेनिस हॉलिबॉल राष्ट्रीय स्पर्धा साठी पात्र ठरले आहे. याबद्दल न्यू एज्युकेशन सोसायटी, राळेगाव चे अध्यक्ष बी. के. धर्मे,सचिव डॉ. अर्चनाताई धर्मे, तसेच शाळेतील सर्व अधिकारी व शिक्षकांकडून विजयी संघाची राळेगाव शहरातील मुख्य रस्त्यावर ब्यांड पथकांसह विजयी रॅली काढून विजेत्यांचे भव्य स्वागत,सत्कार व भोजन देण्यात आले..यावेळी शाळेतील
क्रीडा शिक्षक किशोर उईके, आनंद घुगे, प्रवीण कारेकर, कु वैशाली चौधरी तसेच न्यू एज्युकेशन सोसायटी, राळेगाव चे अध्यक्ष बी. के. धर्मे,सचिव डॉ. अर्चनाताई धर्मे, व शाळेचे मुख्याध्यापक विजय कचरे,उपमुख्याध्यापक सुरेश कोवे, पर्यवेक्षक सूचित बेहरे हे यावेळी उपस्थित होते.तसेच विजेत्यां संघाचे शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे…….