
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा आत्मानुसंधान भू वैकुंठ अड्याळ टेकडी येथे 5 ते 20 मे पर्यंत जीवन शिक्षण शिबिर प्रमुख मार्गदर्शक व संचालक श्री सुबोधदादा यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. डॉ नवलाजी मुळे अध्यक्ष, सुश्री रेखाताई कार्याध्यक्षा, सुश्री लक्ष्मीताई, सुश्री गंगाताई यांनी संपूर्ण शिबिराचे बौद्धिक मार्गदर्शन व संचालन केले. सदर शिबिरात चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, यवतमाळ, नागपूर, वर्धा, नांदेड इत्यादी जिल्ह्यातील 150 मुलामुलींनी सहभाग घेतला होता. श्री अक्षय कुळे गुरुजी, श्री गणेश लांजेवार सर (कराटे प्रशिक्षक), जोशेष वाढई गुरुजी, आयुष आस्वले गुरुजी, कु. शीतल भाजीपाले, कु पूजा-आरती दोनाडकर, विशाखा काजरखने, तेजस्विनी भाजीपाले, संचिता बोरकुटे, डीना मेश्राम, श्रेया चौधरी, दीक्षा वाघ या सर्व प्रशिक्षकांनी विद्यार्थ्यांना सामुदायिक ध्यान-प्रार्थना, शिवकालीन युद्धकला, ग्रामोद्योग, ग्रामगीता ग्रंथ अभ्यास, योग निसर्गोपचार, पंचगव्य उत्पादन, गीत, भजन, भाषण इत्यादी विषयांचे प्रशिक्षण दिले. 20 मे बुधवार रोज सायंकाळी 6 ते 9.30 वाजता पर्यंत या शिबिराचा भव्य समारोपीय प्रदर्शन सोहळा संपन्न झाला. सदर कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून श्री वाल्मीक वैद्य गुरुजी, डॉ अनंता कुंभारे, श्री नामदेव आस्वले गुरुजी, प्रचारिका सौ बेबीताई काकडे, लक्ष्मण पराते गुरुजी, आनंदराव घोणमोडे, दिलीप मेश्राम सर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. श्री निरंजन ठवरे गुरुजी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पार पाडले. श्री धनेश भाई अग्रवाल, दुर्गा राईस मिल यांनी सर्वांना महाप्रसाद भोजन दान व श्री खेमराज तिडके यांनी पिण्याच्या पाण्याची जबाबदारी पार पाडली.श्री राजेंद्र राऊत व सुभाष मेश्राम सहित विकास गजभे, संतोष जांभुळे, केशव हिवरकर, रामदास नखाते, मनोरमा मैंद, माधुरी चौधरी, लक्ष्मी निहारे, पद्मा भेंडारकर यांनी सदर शिबिरात व्यवस्थापनाची भूमिका पार पाडली.
