
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात कार्यरत, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे सदस्य यवतमाळ जिल्हा ग्रंथालय संघाचे सक्रिय सदस्य डॉ अशोक सखुबाई बालाजी फुटाणे यांची जेष्ठ कन्या कुमारी वसुधा रेखा अशोक फुटाणे वडकी हिने महाराष्ट्र शासनाने जिल्हा परिषदे अंतर्गत गट-क मधिल सर्व संवर्गातील सरळ सेवेची रिक्त पदे भरण्या बाबत दिलेल्या मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत त्या नुसार संदर्भ क्र.३२नुसार प्रसिद्ध केलेल्या पद भरती नुसार महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा नियम १९६७ परिशिष्ट नवु(५) दुय्यम लिपिक वर्गातील प्रथम श्रेणी स्वर्गातील कनिष्ठ सहाय्यक (लिपिक)गट-क या पदासाठी सरळ सेवा भरती सन २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या परिक्षेतील गुणांच्या आधारे तयार केलेल्या निवडसुचितील गुणवत्ता पात्रं ठरलेल्या अंतिम निवड सुचिस अध्यक्ष जिल्हा निवड समिती ने मान्यता दिलेली आहे त्या नुसार कनिष्ठ सहाय्यक (लिपिक)गट क या पदासाठी शिक्षण विभाग पंचायत समिती,भोर जिल्हा पुणे येथे कुमारी वसुधा अशोक फुटाणे वडकी हिची निवड करण्यात आली.या अगोदर आदिवासी विभाग ग्रंथपाल पदासाठी घेण्यात आलेल्या परिक्षे मध्ये सुद्धा मुली मधुन प्रथम क्रमांक मिळविला होता शासकीय आदिवासी आयुक्त कार्यालय नागपूर विभागात ग्रंथापाल पदासाठी सुध्दा नियुक्ती करण्यात आली होती.
विविध सामाजिक संघटनांच्या वतीने तथा ग्रंथालय संघटनेच्या वतीने तिचे मन: पुर्वक अभिनंदन करण्यात आले
पुढिल तिच्या या यशामागे असलेल्या मेहनत, चिकाटी आणि समाजांचे संस्कार हे सर्वांना प्रेरणादायी ठरणारे आहेत भविष्यातही ती उच्च शिखरे गाठो.अशा प्रकारे शुभेच्छांचा वर्षाव होत आहे
