शासकीय दुग्धशीतकरण केंद्र बनले खंडर, अन होते ”बीस साल बाद” चित्रपटाची आठवण


प्रतिनिधी::प्रवीण जोशी
ढाणकी


एकेकाळी ढाणकी शहर आणि आजूबाजूचा परिसर दुग्ध व्यवसायासाठी प्रसिद्ध होता तसेच दुग्ध व्यवसाय हा शेतकऱ्यांसाठी अतिशय जिव्हाळ्याचा विषय मानला जातो इतर अनेक पिके हे दीर्घकालीन स्वरूपात असतात त्याला विशिष्ट असा कालावधी लागतो त्यामुळे अनेक शेतकरी दुग्ध व्यवसायाकडे वळले तसेच दुग्ध व्यवसाय करताना अनेक बाबींचा लाभ शेतकऱ्यांना होतो म्हणून जास्तीत जास्त शेतकरी दुग्ध व्यवसायाकडे वळतात अनेक शेतकऱ्यांची यातून आर्थिक उन्नती सुद्धा झाली.

दुग्ध व्यवसायाचे वैशिष्ट्य असे की ग्राहकांना दूध दिल्यानंतर फुल किंवा फुलाची पाकळी जो काही दर ठरला आहे त्या दराप्रमाणे पैसे मिळतात पण इतर पिके घरापर्यंत येत नाही तोपर्यंत त्याचा काहीही भरोसा नसतो नैसर्गिक आपत्ती, किडीचा प्रादुर्भाव, या सर्व बाबींना सामोरे जावे लागते म्हणून शेतकरी दुग्ध व्यवसायाकडे वळला असावा सहकार क्षेत्राची आणि शेतकऱ्याचे संबंध येतो अनेक ठिकाणी सहकारातून अनेक शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती झाली पण लोभी राजकारण्यांनी अख्खे सहकार क्षेत्र खिळखिळ केले व ते गिळंकृत करून पुन्हा आपल्याच पदरात पाडून घेतले हे अनेक ठिकाणच्या कारखानदारीहूनच दिसून येते तत्कालीन बाबीचा विचार करून दुग्ध व्यवसायाशी अनुसरून ढाणकी शहरातील टेंभेश्वरनगर लागून दुग्ध केंद्र उभे केले व तशा प्रकारची सुसज्ज इमारत उभी केली पण काही दिवसात हे शीतकरण केंद्र बंद पडले आता सुसज्ज अशा वास्तूची अवस्था भयान असून सद्यस्थिती मुक्त जनावरांचा सुळसुळाट बकऱ्या चरण्याचे नंदनवन झाले असून संध्याकाळ झाली म्हणजे मदिरा प्राशन करून श्रमपरिहार करण्यासाठी एक उत्तम ठिकाण बनले आहे अनेक कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी सुसज्ज अशा इमारती बनवल्या होत्या पण याची अवस्था आता बिकट झाली असून अनेक खिडक्यांची तावदाने फुटली असून संबंधित यंत्रणे या बाबीकडे लक्ष देऊन या वास्तूचा कायापालट करून समाज उपयोगी कामे झाल्यास अधिक उत्तम होईल व होणारी हागणदारी थांबेल तसेच काही दुग्ध संकलन करणारी यंत्रणा होती ती जागेवर जीर्ण तर झाली पण सर्व ठिकाण गलित गात्र झाले तेव्हा एवढ्या महत्त्वाच्या इमारतीचा प्रश्न लाल फीतशाहीच्या कारभारामध्ये अडकल्या असल्यास तो माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी सोडून या इमारतीला न्याय द्यावा असे सर्व सामान्य जनतेमधून बोलल्या जात आहे