ग्रामपंचायत कीन्ही जवादे पाणी पुरवठा योजनेला क्लोरीन डोझर संयंत्र बसविले

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर

ग्रामीण भागात पाणी नदीपात्रातुन, विहीर,तलाव,यातून उपसा करून पाण्याच्या टाकीत घेऊन गावात नळाद्वारे पुरवठा करण्यात येतो.जलशुध्दीकरणाची कोणतीही व्यवस्था नसते.प्रत्येक वेळी ग्रामपंचायत कर्मचार्यास ब्लीचींग पावडर टाकण्यासाठी जलस्त्रोतापर्यंत जावे लागत होते.ही बाब सुधीर जवादे सरपंच कीन्ही जवादे यांनी पाणी टंचाई मीटींग मधे आमदार डॉ अशोक उईके यांना लक्षात आणून दिले् व तत्कालीन पालकमंत्री ना.संदिपान भुमरे यांना निवेदन देण्यात आले.मा.पालकमंत्री निधी तुन क्लोरीन डोझर बसविण्यात येत आहे.संपुर्ण यवतमाळ जिल्ह्यातुन कीन्ही जवादे ग्रामपंचायत चा प्रस्ताव सर्वात पहिले सादर झाला हे विषेश . आता स्वयंचलीत पध्दतीने पाणी निर्जंतुक केल्या जाईल.शुध्द पाणी मिळत असल्याने नागरिक समाधानी आहे.याकरीता सरपंच सुधीर जवादे, उपसरपंच रमेश तलांडे, सदस्य प्रसाद निकुरे, प्रतिभाताई मोहुर्ले सुषमाताई जवादे सिमाताई ऊईके मालाताई लोणबले सचीव सुनील येंगडे साहेब कर्मचारी पुंडलिकराव लोणबले मारुती ईठाळे धनराज तोडसाम यांनी परिश्रम घेतले.