
यासहसंपादक : रामभाऊ भोयर
जिल्ह्यात दिवसा सूर्य आग ओकत आहे तर सायंकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचे वातावरण निर्माण होतोय. भरदुपारी उन्हात घराबाहेर निघणे कठीण आहे. दुसरीकडे लग्नसराई धुमधडाक्यात सुरू आहे. मात्र, शेतीची कामे आपल्यालाच करावी लागणार, यासाठी उद्याचे स्वप्न डोळ्यांत साठवून जगाचा पोशिंदा शेतकरी रखरखत्या उन्हाचा पारा अंगावर झेलत येणाऱ्या खरिपातील पेरणीसाठी मशागतीच्या कामात व्यस्त दिसून येत आहे.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही तापमानात वाढ झाली आहे. एप्रिल महिन्यात तर घामाच्या धारा झेलत शेतकरी कामात गुंतले होते मे महिन्यांत उष्णते बरोबर सायंकाळ ला ढगाळ वातावरण निर्माण होवून वादळी वारे तसेच काही स्या पावसाच्या सरीने उष्णतेत वाढ होत आहे
त्यामुळे शेतकरी रखरखत्या उन्हात व वादळी वाऱ्याचा मारा सोसत खरिपातील पेरणीपूर्व मशागतीचे कामे करण्यात शेतकरी व्यस्त
कधी उष्णतेचा भडका उडत आहे. गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळेअतिवृष्टी तसेच नैसर्गिक संकटांमुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली. वार्षिक बजेटही कोलमडले. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. निसर्ग, उत्पन्न व शासनाच्या धोरणावर शेतकऱ्यांची मदार असलेल्या शेतीचे दिवस संपले आहेत. निसर्ग साथ देत नाही. उत्पादनात कमालीची घट होत आहे त्याचबरोबर उत्पन्नाला योग्य दर मिळत नसल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहे.
मजूर मिळेना अन् ट्रॅक्टरने परवडेना
तप्त उन्हामुळे मजूर मिळेनासे झाले आहेत. त्यामुळे शेतमजुरांना मोठा भाव आला आहे. ट्रॅक्टरने शेतीची मशागत करणे परवडेनासे झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे अडचण निर्माण झाली आहे. त्याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे कर्ज काढून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांभोवती कर्जाचा फास आवळत चालला आहे.
शेतमालाचे दर घसरल्याने नुकसान
यंदा उत्पादन कमी आणि शेतमालाला दरही कमी अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. उत्पादन खर्च वाढला, त्या तुलनेत यंदा शेतमालाचे दर पडल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. परंतु, हार न मानता पुन्हा बळीराजा नव्या उमेदीने शेती करायला तयार झाला आहे.
