
प्रतिनिधी::प्रवीण जोशी
ढाणकी
ढाणकी शहरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मासानिमित्याने मुखपद यात्रेचे आयोजन केले होते शहरांमध्ये १०/३/२०२४ ते ८/४/२०२४ पर्यंत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास पाळल्या गेला व एक महिना अखंडपणे न चुकता त्यांच्या चरित्रावर माहिती देण्यात आली. याच कार्यक्रमाच्या सांगतेलाअनुसरून ८ एप्रिलला सायंकाळी ही मूकपदयात्रा काढण्यात आली होती. तत्पूर्वी शहरातील हनुमान मंदिरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांना माननारा वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.
यावेळी तरुणांनी मशाल प्रज्वलित केल्यानंतर संभाजी महाराज यांच्या सोबत तत्कालीन काळात घडलेली घटना समोर उभी ठाकली तरुणांनी मोठ्या प्रमाणात शिस्तीचे काटेकोर पालन केले व शांततेचे प्रतिक म्हणून प्रसिद्ध असलेल्या पांढऱ्या रंगाच्या टोप्या सुद्धा डोक्यावर होत्या व तरुणांनी यातून शांततेचा संदेश दिला ही मूकपदयात्रा हनुमान मंदिरापासून ते मुख्य मार्गावरून निघून धर्मवीर छत्रपती शंभूराजे चौक प्रभाग क्रमांक एक येथे मुकपद यात्रेची सांगता झाली
