विशाळगड व गजापुर गावामध्ये मस्जिद व मुस्लिम लोकांवर हल्ला करणा-या समाजकंटकावर कठोर कारवाई करण्याची मागणी

बिटरगांव ( बु ) प्रतिनिधी शेख रमजान

विशाळगडावरील अतिक्रमणाचा मुद्दा कोल्हापूरपर्यंत मर्यादित न राहता आता राज्यात याचे पडसाद उमटू लागले आहेत. विशाळगड प्रकरणात सखोल चौकशी करत दोषींवर कठोर कारवाई करा, अशी मागणी ढाणकी शहरातील मुस्लिम नागरिक यांनी केली आहे.
रविवार, 14 जुलै 2024 रोजी विशाळगड व गजापुर जिल्हा कोल्हापूर येथे काही जातीयवादी लोकानी मुस्लिमांचे धार्मिक स्थळ असलेल्या दर्गा , मस्जिद व निष्पाप मुस्लिम समाजातील लोकावर भ्याड हल्ला केलेला आहे. या हल्ल्यामध्ये दीड, मस्जिदिचे तसेच निष्पाप गरीब मुस्लिम लोकाच्या घराचे व दुकानांचे अतोनात आर्थिक नुकसान केले आहे , या भ्याड कृतीचा निषेध करून ही कृती करणाऱ्या
विशाळगड येथील हजरत मलिक रेहान दर्गाह है सर्वधर्मीय लोकांचे पवित्र स्थान आहे. येथील हजरत मलिक रेहान बाबाच्या दर्गाह वर हिंदू मुस्लिम भाविकाची निस्सीम भक्ती आहे, येथील दर्गाह ही हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक म्हणून संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. गडावरील काही घरे आणि दुकाने यांच्या अतिक्रमणाचा विषय उच्च न्यायालयात प्रलंबित असताना आणि ते काढण्याबाबत मा.न्यायालयाने स्थगिती दिली असताना माजी खासदार छत्रपती संभाजी, रवींद्र पडवळ, बंडा साळोखे यांनी चिथावणी दिल्यामुळे जातीयवादी तरुणांनी एकत्र येऊन विशाळगडावरील पवित्र दर्गाहवर दगडफेक केली, वाईट कृत्य करून देखील गप्प न राहता दंगेखोरांनी परतताना गडाशेजारील गजापुर या गावामधील मस्जिद तसेच मुस्लिम लोकांवर आणि त्याच्या घरावर, दुकानावर भ्याड हल्ला केला, या हल्ल्यामध्ये स्थानिक मुस्लिम लोग गंभीररीत्या जखमी झालेले आहेत त्याचप्रमाणे त्यांचे न भरून निघणारे नोठे आर्थिक नुकसान झालेले आहे, हे कृत्य अत्यंत निंदनीय व बेकायदेशीर आहे. यामुळे महाराष्ट्रातील फक्त मुस्लिमच नाही तर हजरत मलिक रेहान बाबांच्या दर्गाहवर भक्ती असलेल्या सर्व भक्तगणांच्या धार्मिक भावना दुखाविल्या गेल्या आहेत

इस्लाम धर्म तसेच गडावरील स्थानिक रहिवाशांच्या विरुद्ध भड़कावू भाषण देवून एक प्रकारची चिथावणी देण्याचेच काम केले होते, जातीयवादी हल्लेखोरांना अश्या चिथावणीमुळेच हल्ला करण्याची प्रेरणा मिळाली आहे, त्यामुळे माजी आमदार नितीन शिंदे यांना या हल्ल्याला जबाबदार धरून त्यांच्यावर देखील कायदेशीर कारवाई करावी.तसेच माजी खासदार छत्रपती संभाजी यांनी त्यांच्या समर्थकांना 14 जुलै 2024 रोजी विशाळगडावर येण्याचे केलेले आवाहन यामुळे विशाळगड आणि परिसरात जातीयवादी लोकांकडून अश्या प्रकारचा हल्ला होवू शकली याची पूर्वकल्पना असताना देखील कोल्हापूर पोलीस दलाने अत्यंत निष्काळजीपणे हे प्रकरण हातळल्यामुळे हा सुनियोजित हल्ला घडला आहे त्यामुळे या निष्काळजीपणाला जबाबदार असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची चौकशी होवून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी,त्याचप्रमाणे या प्रकरणाची गंभीरपणे दखल येथून त्याची CI.D. मार्फत चौकशी करण्यात यावी तसेच या भ्याड हल्ल्यात ज्या नागरिकाच्या घरांचे, दुकानांचे आर्थिक नुकसान झाले आहे त्यांना राज्य शासनाकडून प्रत्येकी 5 लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, ठाणेदार प्रेम केदार यांच्या मार्फत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मुंबई देवेंद्र फडणवीस , गृहराज्यमंत्री, मुंबई, सत्तार , अल्पसंख्यांक मंत्री, मुंबई यांना प्रेम केदार ठाणेदार , पोलिस स्टेशन, बिटरगांंव ( बु ) ता. उमरखेड जि. यवतमाळ यांच्या मार्फत निवेदन देते वेळी शेख जहीर शेख मौला,जब्बार ये महेमुद,शे जालीर शेख मुनीर,शेआलीम शे कादर,शे जावेद से दुसेन,शे मुस्तकीन शे हूसेन, शेख ख्वाजा शे फकरू व शे इमाम शे.करीम आणि ढाणकी मधील नागरिक उपस्थित होते