
सहसंपादक : रामभाऊ भोयर
नवदुर्गा महिला दुर्गोत्सव मंडळ राळेगाव येथे
नवरात्र उत्सवानिमित्त लहान मुलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी व सामाजिक एकोपा कायम टिकवून ठेवण्या हेतूने ,छोट्या बालकांचे आणि महिलां च्या रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा , मटका फोड स्पर्धा, सॅक्रेस स्पर्धा, संगीत खुर्ची… इत्यादी स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या… व या विविध स्पर्धेमधून प्रथम,द्वितीय आणि तृतीय असे क्रमांक परीक्षकामार्फत काढण्यात आले होते आणि दिनांक 11/10/2024 ला बक्षीस वितरण आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाच्या अध्यक्षा सौ. कुंदाताई शंकरराव नक्षीणे, प्रमुख अतिथी-प्रभाग क्रमांक 17 च्या नगरसेविका मा.सौ.जोत्स्नाताई सुनीलराव डंभारे,न्यू.इं.हा.चे उपमुख्याध्यापक श्री.कोवे सर, तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री. सुनीलभाऊ डंभारे यांचे हस्ते विजेते स्पर्धकांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री राकेश नक्षीने सर यांनी केले. कार्यक्रमाच्या व संपूर्ण नवरात्र उत्सवाकरिता मंडळाच्या सर्व महिला सदस्यांनी व नागरिकांनी यशस्वी सहकार्य केलेतर उपस्थित मान्यवरांचे आभार श्री.प्रवीण मलमे सर यांनी मानले.
