
रिधोरा येथील नागरिकांचा वडकी वीज वितरण विभागाला आंदोलनाचा इशारा
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील वडकी वीज वितरण विभागाचा भोंगळ कारभार असल्यामुळे रिधोरासह परिसरातील जनता त्रस्त झाली असल्याचे दिसून येत आहे. सविस्तर वृत्त असे सध्या शेतकऱ्यांचे पेरणी टोबणीचे दिवस सुरू असून यामध्ये काही लोकांची कपाशीची लागवड झाली आहे. तर काही लोकांची कपाशीच्या लागवडीला सुरुवात झाली आहे ज्या शेतकऱ्यांकडे ओलिताची सोय आहे त्या शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली आहे.तर सध्या कपाशीला पाणी देण्याचे काम सुरू आहे परंतु लाईनच्या अपडाऊनमुळे अंकुर लेली कपाशीचे पिके मरण्याच्या स्थितीमध्ये दिसून येत आहे याचे कारण म्हणजे दिवसा मधून दहा ते पंधरा वेळा लाईटचे अपडाऊन सुरू आहे. तर अकुरलेल्या पिकाला पाणी देणे शक्य होत नाही. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना लाईट का बंद असे विचारले तर ते सांगतात मेंटनस चे काम चालू आहे. असे सांगून आपली वेळ मारून नेत आहे. परंतु सबंधित अधिकाऱ्यांच्या उडवा उडवी च्या उत्तरामुळे शेतकऱ्यांना याचा नाहक त्रास होत असल्याने रिधोरा येथील संताप शेतकरी शेतमजुरांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. तर रिधोरा गावासह परिसरातील जनता वडकी वीज वितरण विभागाच्या भोंगळ कारभाराला कंटाळली आहे. सदर रीधोरासह परिसरातील
सतत वीज खंडित होत असल्याने रिधोरा येथील नागरिकांनी वडकी वीज वितरण कार्यालयावर धाव घेतली आहे. सदर घरातील उपकरणे, लहान मुलांना होणारा त्रास, तसेच आजारी वय वृद्ध वेक्तींना होणारा त्रास, शेतकऱ्याच्या अंकुरलेल्या पिकाला पाणी देण्यास अडथळा निर्माण, तसेच दिवसभर शेतामध्ये राब राब राबून शेतकरी शेतमजूर यांना संध्याकाळी सुखाची झोप लाईट अभावी येत नसल्याने येथील शेतकरी शेतमजूर त्रस्त झाले आहेत तर उन्हाळा असो की पावसाळा असो की हिवाळा असो वडकी वीज वितरण विभाग ग्राहकांना सेवा देण्यात शून्य झाली आहेत तर रिधोरासह परिसरातील संपूर्ण खेड्यापाड्यांमध्ये ट्रांसफार्मर ला असणाऱ्या पेट्या सुद्धा उघड्यावर आहे. या परिसरामध्ये बऱ्याच दहा मोठ मोठे अपघात होऊन काही शेतकरी शेतमजुरांना आपला जीव सुद्धा गमवावा लागला आहे. कारण या परिसरामध्ये सरकारी लाईनमन कमी आणि प्रायव्हेट लाईन म्हण जास्त असल्याने बऱ्याचदा प्रायव्हेट लाईन म्हणच वडकी वीज वितरण विभागाचे या परिसरामध्ये काम पाहत असल्याचे दिसून येत आहे.
परंतु
अजूनही वडकी वीज वितरण विभाग हे झोपेचे सोग घेऊन आहे. तर एखाद्या डीपी वरचा फेज जर गेला तर गावातील नागरिकांना स्वतः जाऊन फेज टाकावा लागतो आपल्या जीवावर बेतून हे सर्व काम करावे लागत आहे या मध्ये काही जीवितहानी झाल्यास याला जबाबदार कोण ? या सर्व बाबीचा आढावा घेऊन रिधोरा सह परिसरातील विद्युत पुरवठा सुरळीत चालू ठेवावा याबाबतचे निवेदन वडकी वीज वितरण विभागाला देण्यात आले आहे. सदर या निवेदनाची दखल न घेतल्यास जनंआदोलन करण्यात येईल असा इशारा रिधोरा गावातील नागरिकाने दिला आहे निवेदन देतेवेळी
गावातील (सरपंच) उमेश गौरकार, अमोल गौळकार,सागर निरगुडवर , गोपीचंद वाढाई, मयूर पंडिले,सुमित मेघरे, गणेश गौळकार, भास्कर तोडासे,शुभम येरणे,नयन आदे, गणेश गाताडे,प्रमोद किन्हेकार,वृषील शेन्डे, सुरेश गाऊत्रे,विकास पंडिले,संस्कार गाऊत्रे,चंद्रशेखर लेणगुरे इत्यादी गावातील नागरिक उपस्थितीत होते.
