
सहसंपादक : रामभाऊ भोयर
ग्रामपंचायत राळेगावचे सेवानिवृत्त जमादार श्री. मधुकरराव निळकंठराव दोंदल यांनी नुकतेच वयाची ७३ वर्षे पूर्ण केली. तसेच अखिल भारतीय वडार समाज संघटना तालुका अध्यक्ष प्रकाशभाऊ देवकर यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालयात सामाजिक बांधिलकी जपत फळ वाटप कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमात पत्रकार बांधवांच्या हस्ते तसेच मित्रपरिवाराच्या उपस्थितीत रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाला डॉ. वानखेडे, पत्रकार महेश शेंडे, राष्ट्रपाल भोंगाडे, फिरोज लाखांनी, मंगेश राऊत, संजय दुरबुडे, अरविंद तामगाडगे, दिलीप कन्नाके, नितीन कोमेरवार, सय्यद लियाकतअली, रुपेश कोठारे, प्रवीण काकडे, महादेव ससाने, नारायण धानोरकर, अनिल गलांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
फळ वाटपाच्या या उपक्रमामुळे रुग्णांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. सामाजिक जाणीव ठेवून साजरा केलेला वाढदिवस ही सकारात्मक परंपरा असल्याचे यावेळी मान्यवरांनी नमूद केले.